Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किवींच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडियाचा डाव कोसळला; वरच्या फळीतले सर्व फलंदाज पॅव्हेलिनमध्ये

आज भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अक्षरशः भारतीय खेळाडूंचे कंबरडे मोडले. सॅन्टनर आणि ग्लेन फिलिप्सने भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 31, 2024 | 03:21 PM
IND vs NZ 2nd Test Team India's innings collapsed in front of the penetrating bowling of the Kiwis; Top-order batsmen in the pavilion

IND vs NZ 2nd Test Team India's innings collapsed in front of the penetrating bowling of the Kiwis; Top-order batsmen in the pavilion

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंज दुसऱ्या कसोटी सामन्यात काल कर्णधार रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर आज सकाळी शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. गिलला बराच वेळ सूर गवसत नव्हता. परंतु, यशस्वी चांगलाच सेट झालेला दिसला. शुभमन गिलला खेळताना अनेक अडचणी येत असल्याचे दिसून आले. अखेर शुभमन गिल सॅन्टनरच्या चेंडूवर पायचित होत पॅव्हेलिनमध्ये परतला. त्यानंतर विराटला देखील सॅन्टरने क्लिनबोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर यशस्वी जयस्वालला ग्लेन फिलिप्सने यशस्वीला डॅरिल मिचेलच्या द्वारे झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतलासुद्धा ग्लेन फिलिप्सने क्लिनबोल्ड केले. त्यानंतर ऋषभ पंतलासुद्धा क्लिनबोल्ड करीत पॅव्हेलिनमध्ये पाठवले.

न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी घसरली

New Zealand spun a web around India's batters in Pune this morninghttps://t.co/3D1D83IgS1 #INDvNZ pic.twitter.com/vYoaOz0adv — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 25, 2024

 

सॅन्टनरने निम्मा संघ बाठवला तंबूत
भारतीय क्रिकेट टीमच्या आज लागोपाठ ४ विकेट गेल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडकडून सॅन्टर टीम इंडियाला जखडून ठेवले. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळपट्टीने फिरकीपटूंना चांगलीच साथ दिली आहे. च्या दिवसात रविचंद्रन अश्विननंतर वाॅशिंग्टन सुंदरने धमाकेदार गोलंदाजीने किवींचा डाव उधळला आणि त्यांना २५९ धावांपार्यंतच रोखून धरले. सरफराज खानदेखील एक मोठा शॅाट मारण्याच्या नादात सोपा झेल मिडअॅानला देऊन बाद झाला. सॅन्टरने आज ४ विकेट घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. दुपारच्या सत्रापर्यंत निम्मा भारतीय संघ तंबूत परतला होता. त्यामुळे आता मॅच कुठपर्यंत चालते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पहिले यश रविचंद्रन अश्विनने मिळवून दिले
आज गहुंजेच्या पिचवर फिरकीपटूंचा बोलबाला चालला. प्रथम रविचंद्रन अश्विनने भारताला यश मिळवून दिले. वरच्या फळीतल्या महत्त्वाचे फलंदाज बाद करीत न्यूझीलंडच्या धावसंख्येला रोखून धरले. भारताने न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवल्याने त्यांना धावा करणे कठीण गेले. अश्विनने कर्णधार टॅाम लॅथम, काॅन्वे, यंगला तंबूचा रस्ता दाखवला. तर बाकीचे सर्व फलंदाज वॉशिंग्टन सुंदरने पॅव्हेलिनमध्ये परत पाठवले.

वॉशिंग्टन सुंदरचा बोलबाला
आज वॉशिंग्टन सुंदरचा बोलबाला चालला, रचिन रवींद्र या न्यूझीलंडच्या सेट फलंदाजाला क्लिन बोल्ड करीत सुंदरने पहिली विकेट घेतली. त्यानंतर डॅरी मिचेल, टोम ब्लंडल, ग्लेन फिलीप्स, एजाज पटेलसह टीम साऊथीला सुंदरने त्रिफळाचित केले. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर किवींचा डाव 259 धावांवर रोखला गेला. यामध्ये सुंदरने आज अचूक गोलंदाजी करीत किवींची मधल्या आणि शेवटच्या फळीतील फलंदाज तंबूत धाडले.

गौतम गंभीरकडून वॉशिंग्टन सुंदरची स्तुती

कालच गौतम गंभीर याने पत्रकार परिषदेत वॉशिंग्टन सुंदरचे गोडवे गायले होते. यामध्ये त्याने वॉशिंग्टन सुंदरवर अधिक भर देत त्याला निश्चितपणे खेळवले जाईल, असा विश्वास व्यक्त केला होता. आज त्याचा हा विश्वास वॉशिंग्टन सुंदरने सार्थ केला.  भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात टीम इंडियाने आपली रणनीती राखून ठेवली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. वॉशिंग्टन सुंदर हा संघाचा भाग असणार, तरीही उद्याच सर्व अंदाज घेऊन ठरवणार प्लेईंग इलेव्हन तसेच आम्ही उद्या पिच आणि नाणेफेक आमच्यासाठी महत्त्वाची राहणार आहे. हे सर्व  पाहूनच खेळाडूंची यादी ठरवू, शुभमन गिल आणि वाॅशिंग्टन संदर निश्चितच संघाचे भाग राहतील परंतु पिच आणि इतर सर्व बाजू पाहूनच आम्ही निर्णय घेणार असल्याचे गौतम गंभीर यांने सांगतिले. यांमध्ये निश्चितच केएल राहुलचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

पुणे टेस्ट जिंकण्याच्या उद्देशाने प्लेईंग इलेव्हन
उद्या आम्ही पिचचा अंदाज घेऊन खेळाडू ठरवणार आहोत. तरी आपल्या येथे टॅलेंट एवढे आहे की, कोणता खेळाडू ठेवायचा कोणता काढायचा हा मोठा प्रश्न आमच्यासमोर असतो. तरी आम्ही यावर निश्चितच उपाय काढून विजयासाठी आवश्यक तयारी करू. असे नाही की हा फक्त पुण्यात प्रश्न येतो असा प्रश्न अनेक ठिकाणी येतो त्याचे कारण म्हणजे भारतात टॅलेंट खूप आहे.

 

Web Title: Ind vs nz 2nd test team indias innings collapsed in front of the penetrating bowling of the kiwis top order batsmen in the pavilion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 11:34 AM

Topics:  

  • india
  • Mitchell Santner

संबंधित बातम्या

टॅफेची 2.14 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स विक्री; FY26 मध्ये स्थानिक बाजारपेक्षाही जलद वाढ
1

टॅफेची 2.14 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स विक्री; FY26 मध्ये स्थानिक बाजारपेक्षाही जलद वाढ

आता नो टेन्शन…! जनगणना २०२७ मध्ये ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना, काय आहे याची प्रक्रिया? जाणून घ्या स्टेप्स
2

आता नो टेन्शन…! जनगणना २०२७ मध्ये ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना, काय आहे याची प्रक्रिया? जाणून घ्या स्टेप्स

India Beauty Market : महिलांचा पगार जातोय तरी कुठे? सुंदर दिसणे पडतेय महागात, 37 हजार कोटींच्या उंबरठ्यावर ब्यूटी मार्केट
3

India Beauty Market : महिलांचा पगार जातोय तरी कुठे? सुंदर दिसणे पडतेय महागात, 37 हजार कोटींच्या उंबरठ्यावर ब्यूटी मार्केट

Strait of Hormuz: होर्मुजचा तिढा सोडवण्यासाठी जागतिक हालचाली! भारतासह 35 देशांची तातडीची बैठक; तर ब्रिटनकडून इराणवर कडक टीका
4

Strait of Hormuz: होर्मुजचा तिढा सोडवण्यासाठी जागतिक हालचाली! भारतासह 35 देशांची तातडीची बैठक; तर ब्रिटनकडून इराणवर कडक टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.