Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait of Hormuz: होर्मुजचा तिढा सोडवण्यासाठी जागतिक हालचाली! भारतासह 35 देशांची तातडीची बैठक; तर ब्रिटनकडून इराणवर कडक टीका

ब्रिटीश परराष्ट्र मंत्री यवेट कूपर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या एका उच्चस्तरीय ऑनलाईन बैठकीत भारतही सहभागी झाला. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या बैठकीत देशाचे प्रतिनिधित्व केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 02, 2026 | 08:16 PM
होर्मुजचा तिढा सोडवण्यासाठी जागतिक हालचाली! (Photo Credit- X)

होर्मुजचा तिढा सोडवण्यासाठी जागतिक हालचाली! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • होर्मुजचा तिढा सोडवण्यासाठी जागतिक हालचाली!
  • भारतासह 35 देशांची तातडीची बैठक
  • तर ब्रिटनकडून इराणवर कडक टीका
World War 3: जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग असलेला ‘होर्मुज जलडमरूमध्य’ (Strait of Hormuz) पुन्हा सुरक्षित आणि खुला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. ब्रिटीश परराष्ट्र मंत्री यवेट कूपर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या एका उच्चस्तरीय ऑनलाईन बैठकीत भारतही सहभागी झाला. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या बैठकीत देशाचे प्रतिनिधित्व केले.

जागतिक अर्थव्यवस्थेवर ‘थेट हल्ला’

बैठकीदरम्यान यवेट कूपर यांनी इराणच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. इराणने हा मार्ग रोखणे किंवा जहाजांना लक्ष्य करणे, हा केवळ लष्करी संघर्ष नसून “जागतिक आर्थिक सुरक्षेवर झालेला थेट हल्ला” असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराणच्या या बेजबाबदारपणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा पुरवठा गंभीर धोक्यात आला आहे, असा दावा ब्रिटनने केला आहे.

भारतासाठी ही बैठक का महत्त्वाची?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत माहिती दिली की, ब्रिटनकडून भारताला या बैठकीसाठी विशेष निमंत्रण मिळाले होते. भारतासाठी हा मार्ग खालील कारणांमुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताची एलएनजी (LNG) आणि कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर याच मार्गावरून होते. सध्या या भागात सुमारे २,००० जहाजांवर २०,००० नाविक अडकले आहेत, ज्यामध्ये भारतीय खलाशांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.

काय आहे ‘बार्बरा विरुद्ध ट्रम्प’ प्रकरण? ज्याच्या सुनावणीसाठी राष्ट्राधक्षांनी लावली हाय-कोर्टात हजेरी

संकटाचे भीषण वास्तव

ब्रिटीश परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या भागात 25 हून अधिक जहाजांवर हल्ले झाले आहेत. यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर खालीलप्रमाणे परिणाम झाला आहे:

1. आशिया: लिक्विड नॅचरल गॅस (LNG) पुरवठ्यात मोठे अडथळे.

2. आफ्रिका: खतांच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न.

३. जागतिक बाजार: जेट फ्युएल (विमानाचे इंधन) पुरवठा विस्कळीत झाल्याने विमान वाहतूक महागण्याची शक्यता.

कुवैत, बहरीन, कतार, यूएई, सौदी अरेबिया, ओमान आणि इराक यांसारख्या आखाती देशांच्या व्यापार मार्गांनाही या कोंडीचा फटका बसला आहे.

राजनैतिक मार्गावर भर

संयुक्त राष्ट्रसंघात (UN) तब्बल 130 देशांनी इराणच्या या आक्रमक कृतीचा निषेध केला आहे. ब्रिटनने स्पष्ट केले आहे की, अमेरिका आणि इस्रायलच्या मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून इराणने हा मार्ग बंद केला असला, तरी या संघर्षात थेट सहभागी नसलेल्या देशांना वेठीस धरणे अन्यायकारक आहे. हे संकट कूटनीतिक मार्गाने सोडवण्यासाठी ब्रिटन आता जागतिक समुदायाचे नेतृत्व करत आहे.

Trump Oil Strategy : डोनाल्ड ट्रम्प होणार ‘इंधन राजा’; अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची दिली सर्वांना ऑफर

Web Title: Global moves to resolve the hormuz standoff urgent meeting of 35 nations including india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • india
  • iran
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?
1

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

Home Credit India : दुचाकीपासून प्रॉपर्टी लोनपर्यंत सर्व गरजांसाठी कर्ज; होम क्रेडिट इंडियाने सुरू केली #LoanMilega मोहीम
2

Home Credit India : दुचाकीपासून प्रॉपर्टी लोनपर्यंत सर्व गरजांसाठी कर्ज; होम क्रेडिट इंडियाने सुरू केली #LoanMilega मोहीम

RBI Rules: ऑनलाइन फसवणूक झाल्यास काळजी करू नका; RBIकडून 25 हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाईची तरतूद
3

RBI Rules: ऑनलाइन फसवणूक झाल्यास काळजी करू नका; RBIकडून 25 हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाईची तरतूद

NATO Summit 2026: ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे जग अणुयुद्धाच्या…’; नाटो प्रमुख मार्क रुटे यांचे इराण धोरणावर मोठे विधान
4

NATO Summit 2026: ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे जग अणुयुद्धाच्या…’; नाटो प्रमुख मार्क रुटे यांचे इराण धोरणावर मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.