
IND vs NZ, 3rd ODI: A display of 'Virat' anger on the field! That one mistake and King Kohli's fury was unleashed; watch the VIDEO.
IND vs NZ, 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. न्यूझीलंडचा संघ शानदार फलंदाजी करताना दिसत आहे. डॅरिल मिचेलने आपले अर्धशतक पूर्ण केले असून तो आणि ग्लेन फिलिप्स क्रिजवर आहेत. दरम्यान, भारताचा स्टार अनुभवी खेळाडू विराट कोहली चर्चेत आला आहे. तो मैदानावर असला की सर्वांचे लक्ष्य वेधून घेत असतो. अशाच एक कृतीने त्याने सर्वांच्या नजरा स्वता:कडे वळवळ्या आहेत. नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊया.
इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान अशी एक घटना घडली ज्याची चर्चा सुरू आहे. क्षेत्ररक्षण करताना विराट कोहली चेंडूला नीट पकडू शकला नाही. ज्यामुळे कोहलीला स्वतःवरच राग अनावर झाला. विराट कोहलीने आपला राग व्यक्त केला असून या सर्व प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : “त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे…” रोहित शर्माच्या मते ‘हा’ खेळाडू भारतीय संघाला सामना जिंकून देणारा ठरणार
न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामना आहे, कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना आपापल्या नावे केला आहे. भारतीय संघाकडून या सामन्यात एक बदल करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी अर्शदीप सिंगला संघात जागा देण्यात आली आहे.
🎥 – JIOHOTSTAR, @JioHotstar pic.twitter.com/nPlGqPd9gp — .. (@OnXtotroll) January 18, 2026
भारत खेळणारा इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज)
न्यूझीलंड खेळणारा इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरिन फॉल्क्स, काइल जेमिसन, ख्रिश्चन क्लार्क, जेडेन लेनोक्स)