रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीसमोर किवींची दाणादाण
IND vs NZ 3rd Test 1st Day : भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. वानखेडेच्या ऐतिहासिक स्टेडियमवर सुरू असलेल्या या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला निश्चितच विजयासाठी खेळावे लागणार आहे, कारण WTC फायनलचे गणित जुळवण्यासाठी भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत विजय मिळवावा लागेल. वानखेडेच्या पिचवर प्रथम फलंदाजी करणारा संघ सर्वाधिक विजयी झालेला आहे, परंतु यावेळीसुद्धा नशीबाने भारताला साथ दिली नाही. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
जड्डूची कमाल
Tea Break on Day 1 of the Mumbai Test!
Ravindra Jadeja stars in the Second Session for #TeamIndia with 3⃣ strikes! 😎
Stay Tuned for the Third & Final Session of the Day!
Scorecard ▶️ https://t.co/KNIvTEy04z#INDvNZ | @imjadeja | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/R3GkGOGEc2
— BCCI (@BCCI) November 1, 2024
Wicket No.3⃣ for Ravindra Jadeja! 🙌 🙌
He is on a roll here in Mumbai! 👍 👍
New Zealand 6 down as Glenn Phillips departs.
Live ▶️ https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @imjadeja | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8GznaWcOJS
— BCCI (@BCCI) November 1, 2024
पहिल्या स्पेलमध्ये भारताला चांगला फायदा
वानखेडेच्या खेळपट्टीवर फलंदाज मोठ्या प्रमाणात धावा करतात. तसे, पाहता प्रथम फलंदाजी करण्याऱ्याला या पिचवर फायदा होतो. परंतु, यावेळेला फिरकीला अनुकूल पिच तयार करण्याची मागणी केली होती. तसेच, काहीसे चित्र आजच्या खेळावरून दिसले. मोहम्मद सिराज आणि आकाशदीप या ओपनर गोलंदाजांनी सामन्याची सुरुवात केली. परंतु, कर्णधार रोहित शर्माने रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाहेर काढले.
सुंदरनेसुद्धा 2 विकेट चटकवल्या
भारताच्या ओपनर गोलंदाज आकाशदीप याला अगदी लवकर यश मिळाले. त्याने डेव्हीड कॉन्वेला पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने वॉशिंग्टन सुंदरला बाहेर काढले आणि रोहित निर्णय यशस्वी झाला. वॉशिंग्टन सुंदरला खेळपट्टीची चांगली साथ मिळाल्याचे पाहायला मिळाले. वॉशिंग्टन सुंदरने लागलीच न्यूझीलंडचा कर्णधार टॅाम लॅथमला क्लिन बोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडचा दुसरा स्टार फलंदाज रचिन रविंद्रला लागलीच पुन्हा एकदा क्लिन बोल्ड केले. न्यूझीलंडच्या तीन विकेट गेल्या तोपर्यंत मध्यान्हपर्यंत पहिले सेशन संपले होते. लंच टाईम पर्यंत किवींनी 3 विकेट गमावून 145 धावा केल्या होत्या.
जड्डूचा पंच
दुसऱ्या सत्रात रोहितने रविंद्र जडेजाला बाहेर काढले आणि जड्डूने करून दाखवले. जड्डूच्या चेंडूला चांगलेच स्पीन मिळत होते. राईट हॅंडच्या फलंदाजांसाठी लेफ्ट आर्म गोलंदाजांने लेगस्पीनने सेट बॅट्समन विल यंगला रोहित शर्माद्वारे झेलबाद केले. त्यानंतर लगेचच टॉम ब्लंडेलला त्रिफळाचित केले. काही अंतराने लगेच ग्लेन फिलिप्सदेखील जड्डूच्या गोलंदाजीवर फसला आणि क्लिन बोल्ड झाला. जड्डूने आज लागोपाठ पुन्हा सोधी आणि हेन्री ला बाद करीत 5 विकेट घेतल्या.
उन्हाच्या तडाख्याने खेळाडू हैराण असताना जड्डूची कमाल
अगदी उन्हाच्या तडाख्यात रविंद्र जडेजाने महत्त्वाची विकेट घेतल्या. पूर्ण सेट असलेल्या विल यंगला बाद करीत न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. या खेळपट्टीवर फिरकीपटूला आणखी फायदा होणार आहे. जस जसा वेळ जाईल तसे पिच आणखी ड्राय होणार आहे आणि त्यामुळे स्पीनरला खूप फायदा होणार आहे. पहिल्याच दिवशी फिरकीला चांगली साथ मिळत असल्याने अजून आणखी काही दिवसांनी स्पीनर्सला मोठा फायदा होणार आहे, त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर मोठे आव्हान असणार आहे.