IND vs NZ 3rd Test Ravindra Jadeja believed in the team's performance It's teamwork, you can't blame anyone
IND vs NZ 3rd Test Ravindra Jadeja : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्यात किवींचा डाव 239 धावांवर आटोपला. यामध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक स्पेल रविंद्र जडेजाने महत्त्वाच्या 5 विकेट घेतल्या. परंतु, भारतीय संघाची फलंदाजी पुन्हा एकदा कमी पडली अगदी शेवटच्या क्षणी भारतीय संघाने लागोपाठ 3 विकेट गमावल्या. पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या धावा होणे हे टेस्ट मॅच आपल्या बाजूने करण्यासारखे आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जड्डूने सांघिक कामगिरीवर विश्वास व्यक्त केला.
हे टीमवर्क
ही टीम आहे, कोणा एकावर ब्लेम नाही करू शकत. आम्ही कधीच एकमेकांवर आरोप केले नाहीत, ड्रेसिंग रूममध्ये सुद्धा आम्ही कोणाला पॉईंट आऊट करीत नाही. हे टीमवर्क आहे. कारण प्रत्येकाकडून काही ना काही छोटी-मोठी चूक राहतेच त्यामुळे तुम्ही कोणा एकाला पॉईंटआऊट नाही करू शकत. त्यामुळे विजय झाला तर तो सर्व पंधरा जणांचा आहे आणि पराभवसुद्धा सर्व 15 जणांचाच आहे. त्यामुळे तुम्ही कोणा एकाला दोष नाही देऊ शकत. कारण नेहमीच प्रत्येकाकडून काही ना काही राहतच असते. म्हणून आम्ही आमची कामगिरी सुधारण्यावर विश्वास ठेवतो.
जड्डूचा ‘पंच’
Tea Break on Day 1 of the Mumbai Test!
Ravindra Jadeja stars in the Second Session for #TeamIndia with 3⃣ strikes! 😎
Stay Tuned for the Third & Final Session of the Day!
Scorecard ▶️ https://t.co/KNIvTEy04z#INDvNZ | @imjadeja | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/R3GkGOGEc2
— BCCI (@BCCI) November 1, 2024
आम्ही पहिल्या इनिंगमध्ये कमी पडलो
आम्ही पहिल्यापासूनच मागे राहिलो. पहिल्या मॅचमध्ये आम्ही मागे पडलो, आम्ही फलंदाजी निश्चितच कमी पडलो. तुम्ही 2-0 ने मागे असाल तर पुन्हा बाऊन्स बॅक करू शकणार नाही. आम्ही पहिल्या टेस्टमध्ये पहिल्याच इनिंगमध्ये कमी पडलो. आम्हाला पहिल्या इनिंगमध्ये चांगला स्कोअर उभा करणे आवश्यक आहे, जो आम्ही करू शकलो नाही. त्यामुळे आम्हाला हे करणे गरजेचे आहे. आताही आम्हाला आजच्या विकेट गेल्या हा भाग वेगळा पण उद्या येणाऱ्या फलंदाजांनी चांगील भागीदारी करून न्यूझीलंडच्या स्कोअर पेक्षा मोठा स्कोअर करावा लागणार आहे.
हे आश्चर्यकारक, शेवटच्या सेशनमध्ये अचानक 3 विकेट
10 मिनिटात सर्व झाले, परंतु उद्या येणारे फलंदाज असतील त्यांनी चांगली खेळी करणे गरजेचे आहे. तुम्ही रिलॅक्स नाही राहू शकत. आमच्यावर प्रेशर असतो, वरच्या फळीतल्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी नाही केली तरी आम्हाला हे करावेच लागेल. अगदी शेवटच्या सेशनमध्ये आणि खेळ संपायला काही मिनिटे असताना आमच्या धडाधड विकेट गेल्या, हे आमच्यासाठी अपेक्षित नव्हते परंतु ठिक आहे पुढे आम्ही चांगली कामगिरी करू.
जड्डूचा पंच
दुसऱ्या सत्रात रोहितने रविंद्र जडेजाला बाहेर काढले आणि जड्डूने करून दाखवले. जड्डूच्या चेंडूला चांगलेच स्पीन मिळत होते. राईट हॅंडच्या फलंदाजांसाठी लेफ्ट आर्म गोलंदाजांने लेगस्पीनने सेट बॅट्समन विल यंगला रोहित शर्माद्वारे झेलबाद केले. त्यानंतर लगेचच टॉम ब्लंडेलला त्रिफळाचित केले. काही अंतराने लगेच ग्लेन फिलिप्सदेखील जड्डूच्या गोलंदाजीवर फसला आणि क्लिन बोल्ड झाला. जड्डूने आज लागोपाठ पुन्हा सोधी आणि हेन्री ला बाद करीत 5 विकेट घेतल्या.
उन्हाच्या तडाख्याने खेळाडू हैराण असताना जड्डूची कमाल
अगदी उन्हाच्या तडाख्यात रविंद्र जडेजाने महत्त्वाची विकेट घेतल्या. पूर्ण सेट असलेल्या विल यंगला बाद करीत न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. या खेळपट्टीवर फिरकीपटूला आणखी फायदा होणार आहे. जस जसा वेळ जाईल तसे पिच आणखी ड्राय होणार आहे आणि त्यामुळे स्पीनरला खूप फायदा होणार आहे. पहिल्याच दिवशी फिरकीला चांगली साथ मिळत असल्याने अजून आणखी काही दिवसांनी स्पीनर्सला मोठा फायदा होणार आहे, त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर मोठे आव्हान असणार आहे.