Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 4th ODI Score: भारताच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे न्यूझीलंडने केला धावांचा डोंगर, 334 धावांचे लक्ष्य

IND vs NZ 4th ODI Score: भारत आणि न्यूझीलंडचा चौथा एकदिवसीय सामना हा आज माऊंट माऊंगानुईमध्ये खेळला जातोय आणि न्यूझीलंडने भारताला 334 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतासमोर मोठे आव्हान

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 13, 2026 | 11:18 AM
IND vs NZ: भारतासमोर धावांचे आव्हान (फोटो सौजन्य - X.com)

IND vs NZ: भारतासमोर धावांचे आव्हान (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि न्यूझीलंडचा चौथा एकदिवसीय सामना बे ओव्हलमध्ये 
  • भारतसमोर न्यूझीलंडचे    धावांचे लक्ष्य 
  • भारत हे आव्हान पेलणार की नाही? 
IND vs NZ 4th ODI Score: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील चौथा आणि सर्वात महत्त्वाचा सामना आज न्यूझीलंडमध्ये माऊंट माऊंगानुईमध्ये रंगला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर कर्णधारपद भूषवत असून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांपैकी पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने आधीच आघाडी घेतली आहे. 

तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर चौथ्या सामन्यावर न्यूझीलंडने धावांचा डोंगर उभारून मजबूत पकड मिळवली आहे. आता भारताला जिंकण्यासाठी 334 धावा कराव्या लागणार आहेत. 

Will Young: विल यंगचा भारताविरुद्ध धुमाकूळ! जीवनदान मिळाले अन् पठ्ठ्याने केलं सोनं, 88 चेंडूत धमाकेदार शतक

विल यंग आणि टीम सायफर्ट या सलामीवीरांची कमाल

न्यूझीलंडचे सलामीवीर टीम सायफर्ट आणि विल यंगने आज न्यूझीलंडच्या संघाची धुरा सांभाळली. विल यंगला दोन वेळा जीवनदान मिळाले आणि त्याने या संधीचे सोने केले. शतक झळकवत त्याने आपले काम पूर्ण केले. तर टीम सायफर्टनेदेखील दहा षटकांमध्ये ५० धावा काढत न्यूझीलंडला चांगली सुरूवात करून दिली. एका बाजूने विल यंगने बाजू लाऊन धरली आणि न्यूझीलंडला एक चांगला स्कोअर उभारून दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षण 

India’s fielding lapses hand New Zealand early lifelines in 4th NZ vs IND 2026 ODI https://t.co/H02IeKq8wr — Cricket Hub (@Anurag9793) November 13, 2026

आकिब नबी न्यूझीलंडच्या डावातील दुसरे षटक टाकत होता. षटकाच्या पाचव्या चेंडूवर, चेंडू फलंदाज विल यंगच्या बॅटची कड घेऊन पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकडे गेला. चेंडू चांगल्या उंचीवर होता आणि रोहितने तो सहज पकडला असता, पण चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि त्याने झेल सोडला. 

पुढच्याच चेंडूवर देखील विल यंगच्या बॅटची बाहेरील कड लागली आणि चेंडू स्लिप आणि यष्टीरक्षकाच्या मधून गेला. त्यानंतर इशान किशनने झेप घेऊन चेंडू पकडण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्याही हातातून निसटला. अशाप्रकारे, विल यंगला सलग दोन चेंडूंवर दोनदा जीवदान मिळाले.

IND vs NZ: Tim Seifert च्या तुफानी खेळीने तुटला 27 वर्षाचा जुना रेकॉर्ड, पॉवरप्लेमध्ये केले भारताला उद्ध्वस्त

श्रेयस अय्यर कर्णधार तर ईशान किशन उपकर्णधार 

आजच्या सामन्यात श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी रवाना झाला आहे. केएल राहुलही आजच्या सामन्यात खेळत नाहीये. श्रेयस अय्यरला कर्णधारपद देण्यात आले असून, ईशान किशन उपकर्णधार म्हणून काम पाहत आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवरही बारकाईने लक्ष असेल. न्यूझीलंड संघातही अनेक बदल करण्यात आले आहेत. 

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंडचा सामना कुठे रंगला आहे?

    Ans: भारत आणि न्यूझीलंडचा सामना बे ओव्हल इथे खेळविण्यात येत आहे

  • Que: हा कितवा सामना आहे

    Ans: आज चौथा एकदिवसीय सामना खेळण्यात येत आहे

  • Que: भारताला जिंकण्यासाठी किती धावांची गरज?

    Ans: भारताला जिंकण्यासाठी ३३४ धावांची गरज आहे

Web Title: Ind vs nz 4th odi score india needs 334 runs to win against new zealand dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • indian cricket team

संबंधित बातम्या

Will Young: विल यंगचा भारताविरुद्ध धुमाकूळ! जीवनदान मिळाले अन् पठ्ठ्याने केलं सोनं, 88 चेंडूत धमाकेदार शतक
1

Will Young: विल यंगचा भारताविरुद्ध धुमाकूळ! जीवनदान मिळाले अन् पठ्ठ्याने केलं सोनं, 88 चेंडूत धमाकेदार शतक

IND vs NZ: Tim Seifert च्या तुफानी खेळीने तुटला 27 वर्षाचा जुना रेकॉर्ड, पॉवरप्लेमध्ये केले भारताला उद्ध्वस्त
2

IND vs NZ: Tim Seifert च्या तुफानी खेळीने तुटला 27 वर्षाचा जुना रेकॉर्ड, पॉवरप्लेमध्ये केले भारताला उद्ध्वस्त

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाचा ‘खेळ’? चौथा वनडे रद्द होणार? पाहा Weather Report
3

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाचा ‘खेळ’? चौथा वनडे रद्द होणार? पाहा Weather Report

IND vs NZ: कर्णधार बदलला, संघही बदलला! आता मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज; भारत-न्यूझीलंड चौथा वनडे कधी अन् कुठे रंगणार?
4

IND vs NZ: कर्णधार बदलला, संघही बदलला! आता मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज; भारत-न्यूझीलंड चौथा वनडे कधी अन् कुठे रंगणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.