
IND vs NZ
मालिका जिंकण्यासाठी भारताला उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकणे आवश्यक आहे. जर न्यूझीलंडने दोन्ही सामने जिंकले, तर मालिका २-२ अशी बरोबरीत येईल. आता सर्वांचे लक्ष चौथ्या एकदिवसीय सामन्यावर लागले आहे. भारत आणि न्यूझीलंड चौथा सामना कधी आणि कुठे रंगणार, जाणून घेऊयात.
WTC Points Table चं समीकरण फिरलं! वेस्ट इंडिजने बांग्लादेशचं गणित बिघडवलं; भारताची मात्र बल्ले-बल्ले
न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व आणि संघ दोन्ही बदलणार आहेत. कसोटी मालिकेचे व्यवस्थापन करण्यासाठी, पहिल्या तीन सामन्यांनंतर शुभमन गिल आणि केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे, उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करेल.
कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरसमोर संघाला मालिका विजय मिळवून देण्याचे आव्हान असेल. विकेटकीपर-फलंदाज ईशान किशनचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तो आपल्या आक्रमक फलंदाजीने मधल्या फळीला बळकटी देऊ शकतो. नवीन कर्णधार आणि नवीन संघरचनेसह, भारतीय संघ चौथ्या एकदिवसीय सामन्यात आपली विजयी मालिका पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील चौथा सामना शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. हे दोन्ही संघ माउंट मोंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकतील. भारतीय वेळेनुसार सामना सकाळी ७. ३० वाजता सुरु होईस तर नाणेफेक ७ वाजता होईल.
हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. सोनी लिव्ह ॲपद्वारे तुम्ही टीव्हीवर किंवा मोबाईल फोनवर सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) उपलब्ध असेल.
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर आणि उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.