
IND vs NZ 4th T20I: Will Suryakumar's army continue their winning streak? India wins the toss and opts to bowl; New Zealand will bat.
IND vs NZ 4th T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना आज विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. समान्यापूर्वी भारताने नानेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. पहिले तिनही सामने भारताने जिंकून मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली असून या सामन्यात देखील विजय मिळवून भारत आपला दबदबा कायम रखण्यास उत्सुक असणार आहे. तर किवी संघ आजचा सामना जिंकून भारतीय संघाचा विजयी रथ रोखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
टॉस जिंकणारा भारताच्या कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसत आहे आणि आम्हाला नंतर येथे सराव करण्याची संधी मिळेल. ला वाटते की महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरात आम्ही ज्या चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत, त्या केवळ या मालिकेतच नव्हे, तर पुढेही कायम ठेवणे. हे एक सुंदर मैदान आहे आणि येथील प्रेक्षकही खूप छान आहेत. आशा आहे की मुले उत्साहात असतील आणि आमची रात्र चांगली व मनोरंजक जाईल. गेल्या सामन्यात दुखापत झालेल्या इशान किशनच्या जागी अर्शदीप संघात आला आहे.”
न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस गामावल्यावर म्हटले की, “ही खेळपट्टी पुन्हा एकदा चांगली दिसत आहे. दव पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे नंतर खेळणे थोडे अधिक कठीण होऊ शकते. धावा आणि स्कोअर निश्चितपणे वाढत आहेत. आम्हाला या भारतीय संघाच्या गुणवत्तेची कल्पना आहे आणि आम्ही ते पहिल्या तीन सामन्यांमध्ये पाहिले आहे. आम्हाला गोलंदाजीमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. लॉकी अजूनही संघाबाहेर आहे आणि फिन (ॲलन) येत आहे, त्यामुळे आमच्या संघात आणखी काही खेळाडू सामील होणार आहेत. पण भूमिका बऱ्यापैकी स्पष्ट आहेत आणि विश्वचषकातही आम्हाला कदाचित अशाच खेळपट्ट्या मिळतील. एक बदल – जेमिसनच्या जागी फॉक्स संघात आला आहे. लॉकी आणि फिन अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत, पण ते परत येत आहेत हे चांगले आहे.”
🚨 Toss and Team Update 🚨#TeamIndia elect to field in the 4th T20I. Arshdeep Singh comes in for Ishan Kishan, who misses out due to a niggle. Updates ▶️ https://t.co/GVkrQKKyd6 #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/lNUgpWiLsm — BCCI (@BCCI) January 28, 2026
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टिम सेफर्ट (डब्ल्यू), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सॅन्टनर (क), झकरी फॉल्केस, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी
भारत प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (डब्ल्यू), सूर्यकुमार यादव (क), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह