Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 4th T20I: ‘मिस्टर 360’ च्या रडारवर खास विक्रम! मैदानावर ‘हा’ पराक्रम करताच ‘रो-को’च्या क्लबमध्ये करणार एंट्री 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा टी-२० सामना बुधवारी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला विक्रम करण्याची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 27, 2026 | 04:58 PM
IND vs NZ 4th T20I: 'Mr. 360' has a special record in his sights! As soon as he achieves this feat on the field, he will enter the 'Ro-Ko' club.

IND vs NZ 4th T20I: 'Mr. 360' has a special record in his sights! As soon as he achieves this feat on the field, he will enter the 'Ro-Ko' club.

Follow Us
Close
Follow Us:

Suryakumar Yadav is set to complete 3000 T20 runs : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले तिनही सामने भारताने जिंकून मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना बुधवारी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे. सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. या मालिकेत त्याने मागील दोन्ही सामन्यांमध्ये सलग अर्धशतके झळकावली आहेत. या मालिकेतील चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला आणखी एका खास क्लबमध्ये प्रवेश करण्याची नामी संधी चालून आली आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकाचे समीकरण बदलणार! पाकिस्तान बाहेर अन् बांगलादेश आत? ICC चा मोठा डाव

रो-कोच्या क्लबमध्ये सामील होणार

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आतापर्यंत १०२ सामन्यांच्या ९६ डावात ३६.९८ च्या सरासरीने आणि १६५.०३ च्या स्ट्राईक रेटने २९५९ धावा फटकावल्या आहेत. जर त्याने विशाखापट्टणममध्ये ४१ धावा केल्या तर तो क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ३,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरेल. सूर्यकुमार यादवपूर्वी रोहित आणि कोहली यांनी ही किमया साधली आहे.  रोहित शर्माने  १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४,२३१ धावा केल्या आहेत, तर विराट कोहलीने १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४,१८८ धावा काढल्या आहेत. तथापि, विराट कोहली आणि रोहित शर्माने आता या स्वरूपातून निवृत्ती घेतली आहे. तसेच आता सूर्यकुमार यादव या स्वरूपात सर्वाधिक सक्रिय भारतीय धावा करणारा फलंदाज आहे.

सूर्या सर्वात जलद ३,००० क्लबमध्ये करणार प्रवेश

बुधवारी होणाऱ्या टी२० सामन्यात सूर्यकुमार यादवने ४१ धावा केल्या तर  तो ९७ डावांमध्ये त्याचे ३,००० धावा पूर्ण करू शकतो. यामुळे तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ३,००० धावांचा टप्पा गाठणारा पाचवा फलंदाज ठरेल. मोहम्मद रिझवान या यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहे, त्याने ७९ डावांमध्ये ही कामगिरी बजावली केली आहे. कोहली आणि बाबर आझम यांनी ८१ डावांमध्ये हा टप्पा गाठला असून तर युएईचा फलंदाज मोहम्मद वसीमने ८४ डावांमध्ये ३,००० धावा पूर्ण केल्या आहेत.

हेही वाचा : Under-19 World Cup 2026 : वैभव सूर्यवंशी एक्सप्रेस सुसाट! झिम्बाब्वेविरुद्ध २४ चेंडूत ठोकले अर्धशतक; रचला इतिहास

संघ पुढीलप्रमाणे आहेत:

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.

न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, जॅक फोक्स, मॅट हेन्री, काइल जेमिसन, बेवन जेकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, टिम सेफर्ट.

Web Title: Ind vs nz suryakumar yadav has a chance to reach 3000 t20 runs in the fourth t20 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Rohit Sharma
  • Suryakumar Yadav
  • T-20 Series
  • T20 cricket
  • virat kohali

संबंधित बातम्या

IND vs NZ : भारताविरुद्ध मालिका गमावल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता! बार्डाने केली घोषणा
1

IND vs NZ : भारताविरुद्ध मालिका गमावल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता! बार्डाने केली घोषणा

शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरार अहमदच्या वादग्रस्त हावभावावर रोहित शर्माची प्रतिक्रिया, पहा Video
2

शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरार अहमदच्या वादग्रस्त हावभावावर रोहित शर्माची प्रतिक्रिया, पहा Video

IND vs NZ T-20 Series : श्रेयस अय्यरला लागली लॉटरी! संघातील स्थान राहणार कायम; तिलक वर्मा T20I मालिकेबाहेर
3

IND vs NZ T-20 Series : श्रेयस अय्यरला लागली लॉटरी! संघातील स्थान राहणार कायम; तिलक वर्मा T20I मालिकेबाहेर

IND vs NZ 3rd T-20 Match : युवराज सिंगचा विक्रम मोडला जाईल? अभिषेक शर्माच्या उत्तराने चाहत्यांच्या मनात केले घर 
4

IND vs NZ 3rd T-20 Match : युवराज सिंगचा विक्रम मोडला जाईल? अभिषेक शर्माच्या उत्तराने चाहत्यांच्या मनात केले घर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.