उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने क्रिकेट विश्व हळहळले(फोटो-सोशल मीडिया)
Sachin Tendulkar expressed his condolences on the passing of Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये दुख:द निधन झाले. या अपघातात विमानात पप्रवास जरीत असलेल्या सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या निधनाने सर्वच क्षेत्रातातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. क्रिकेट जगतातून देखील अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : भारतीय फिरकीपटू कामगिरी उंचावणार? न्यूझीलंडविरुद्ध दबदबा ठेवणार सूर्याआर्मी
सचिन तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले की, “अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्राने संपूर्ण राज्यातील लोकांसाठी काम करणारा एक समर्पित नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना माझ्या मनापासून संवेदना. ओम शांती.”
तसेच अजित पवार यांच्या निधनाबद्दल अजिंक्य रहाणे याने देखील शोक व्यक्त केला आहे. अजिंक्य रहाणेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या दुःखद निधनाने मी दुःखी आहे. त्यांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना आहेत.”
अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. 🙏🏽 Very sad to learn about the untimely demise of… — Sachin Tendulkar (@sachin_rt) January 28, 2026
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक नेते होते. त्यांच्या निधनाने राज्य आणि राष्ट्रीय राजकीय क्षेत्रात धक्का बसला आहे. अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांनी त्यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश करून विविध महत्वाची पदं त्यांनी भुसवली आहेत. अजित पवार हे शरद पवार यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे पुत्र होते. त्यांनी बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.
अजित पवार यांनी वयाच्या २३ व्या वर्षी राजकारणामध्ये प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी निवडणूक लढवली होती. त्यानंतर, १९९१ मध्ये ते पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षही झाले होते. त्याच वर्षी त्यांनी बारामती संसदीय मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवून जिंकली देखील होती. परंतु, नंतर त्यांनी ती जागा त्यांचे काका शरद पवार यांना सोडली होती. त्यानंतर शरद पवार केंद्रीय राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे हातात घेऊन सर्व काम पाहू लागले.
Saddened by the tragic passing of Maharashtra Deputy CM Ajit Pawar dada. My thoughts are with his family. 🙏 — Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 28, 2026
अजित पवार १९९५ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सलग विजय मिळवला. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. अजित पवार यांनी १९८५ मध्ये सुनेत्रा पवार यांच्याशी लग्न केले. त्यांना पार्थ पवार आणि जय पवार ही दोन मुले आहेत.
अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा काम केले आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी कृषी, ऊर्जा, नियोजन, ग्रामीण विकास आणि जलसंपदा शा महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळलेला आहे. त्यांनी कृष्णा खोरे आणि कोकण सिंचन प्रकल्पांची जबाबदारी देखील सांभाळली.






