फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय क्रिकेट संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता टीम इंडियाचा सामना २ मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंड आणि भारत हे गट अ मध्ये आहेत आणि सध्या किवी संघाचे ४ गुण आहेत आणि ते गट अ टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर टीम इंडिया ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि नेट रन रेटच्या आणि गुणांच्या आधारावर पहिले दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. दोन्ही संघ ग्रुप अ मधील मजबूत संघ आहेत. सध्या दोन्ही संघ स्पर्धेमध्ये अपराजित आहेत त्यामुळे सेमीफायनलमध्ये एकही सामना न गमावता संघ प्रवेश करण्याच्या इराद्यात असतील.
आता जर टीम इंडियाला गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवायचे असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत न्यूझीलंडला हरवावे लागणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये मोठे बदल दिसून येऊ शकतात. भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध सामन्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या भारतीय संघाच्या प्लेइंग-११ मध्ये बदल दिसून येतात. कर्णधार रोहित शर्मा रोहित शर्मा दुखापती कदाचित हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत शंका आहे. रोहितच्या अनुपस्थितीत, केएल राहुल डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. त्याच वेळी, गेल्या सामन्यात ताप आलेला ऋषभ पंत आता तंदुरुस्त आहे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या प्लेइंग-११ मध्ये सामील होऊ शकतो.
दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या मोहम्मद शमीला या सामन्यासाठी विश्रांती मिळू शकते. शमीच्या जागी अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते. अशाप्रकारे, अर्शदीप सिंगला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभमन गिलला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जर रोहित शर्माला पुढील सामन्यापासून विश्रांती दिली गेली, तर शुभमन गिल टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.
सलामीवीर – शुभमन गिल, केएल राहुल (जर रोहित तंदुरुस्त नसेल तर)
मधली फळी – विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत
अष्टपैलू खेळाडू – हार्दिक पांड्या
फिरकी गोलंदाज – अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप/वॉशिंग्टन सुंदर
वेगवान गोलंदाज – अर्शदीप सिंग, हर्षित राणा (जर शामी तंदुरुस्त नसेल तर अर्शदीप)
शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.