Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: ‘अर्ध्यावरती डाव मोडला…’ न्यूझीलंडचे वाजले 3-13, भारताने उडवली भंबेरी; १८६ धावांचे आव्हान

IND vs NZ: पहिल्या षटकापासून भारताने न्यूझीलंडवर पकड ठेवली आणि केवळ षटकांमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा डाव गुंडाळला. ५० षटकं पूर्णही करू दिली नाहीत. आता भारतासमोर धावांचे आव्हान

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 04, 2026 | 11:11 AM
IND vs NZ: भारतीय संघाने केली उत्तम कामगिरी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

IND vs NZ: भारतीय संघाने केली उत्तम कामगिरी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय गोलंदाजांनी उडवली न्यूझीलंडची झोप 
  • ५० षटकंही पूर्ण करू दिली नाहीत 
  • भारतासमोर    धावांचे आव्हान 
IND vs NZ: नाणेफेक हरल्यानंतर न्यूझीलंडला भारताने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. किवी संघाला भारतीय गोलंदाजांना नीट सामोरं जाता आलं नाही. अर्शदीप सिंगने चार बळी घेतले. गुरनूर ब्रार आणि अंशुल कंबोज यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत. दरम्यान, रोहित शर्माने एका जादुई थ्रोने डॅरिल मिचेलला धावबाद केले. 

आजच्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आणि त्या सर्वांनीच कमालीची कामगिरी केली. तर स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला वगळण्यात आले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

न्यूझीलंडच्या संघाची कामगिरी 

अकीब नबीच्या चौथ्या षटकात नमन धीरने टिम सायफर्टला जीवदान दिले. मात्र, पाचव्या षटकात श्रेयस अय्यरने कोणतीही चूक केली नाही. विल यंगने अर्शदीप सिंगचा एक चेंडू चुकवला आणि श्रेयसने तो उंच उडणारा चेंडू सहज झेलला. त्याने ९ धावांची जलद खेळी केली. पाचव्या षटकात न्यूझीलंडची धावसंख्या १ गडी बाद २२ होती.

दरम्यान भारताने फलंदाजी पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. नवव्या षटकात अर्शदीप सिंगने हेन्री निकोल्सला बाद केले. नमन धीरने झेल घेतला. न्यूझीलंडची धावसंख्या २ गडी बाद ४० होती. डॅरिल मिचेल टिम सायफर्टला साथ देण्यासाठी आला. 

IND vs NZ: पापणी लवण्याआधीच कमालीचा झेल, गुरनूर ब्रारचा धमाका; वीजेपेक्षा जलद वेगाने पकडला चेंडू, Video Viral

अंशुल कंबोजची अचूक गोलंदाजी 

अंशुल कंबोज भारतासाठी अचूक गोलंदाजी करत असून, त्याने आपल्या चार षटकांत केवळ ८ धावा दिल्या. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम गुरनूर ब्रारच्या गोलंदाजीवर ३ धावांवर बाद झाला. गुरनूरने स्वतःच्याच गोलंदाजीवर एक अप्रतिम डावखुरा झेल घेतला. यासह, न्यूझीलंडने ८४ धावांवर आपली चौथी विकेट गमावली.

भारतीय संघाने डॅरिल मिचेलची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आहे. रोहित शर्माने झेपावत थ्रो करून त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यामुळे न्यूझीलंडच्या १०० धावांच्या आत पाच विकेट्स पडल्या. २२ षटकांनंतर संघाची धावसंख्या ९९/५ आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडवर पूर्ण दबाव टाकला आहे. कर्णधार मिचेल सँटनरही बाद झाला आहे. अंशुल कंबोजने त्याला त्रिफळाचीत केले. त्याने १६ चेंडूंमध्ये ४ धावा केल्या होत्या. २७ षटकांनंतर संघाची धावसंख्या ६ गडी बाद ११३ आहे. ग्लेन फिलिप्स मात्र क्रीजवर कायम आहे. विराट कोहलीने अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर सेकंड स्लिपमध्ये एक अप्रतिम झेल घेऊन नॅथन स्मिथला (१) बाद केले. २८.३ षटकांत न्यूझीलंडची धावसंख्या ७ गडी बाद ११५ आहे.

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडियाने जिंकले नाणेफेक; गोलंदाजीचा घेतला निर्णय

अर्शदीप सिंगची कमाल

अर्शदीप सिंगने काईल जेमिसनला (१) कव्हरमध्ये विराट कोहलीकरवी झेलबाद करून न्यूझीलंडला आठवी विकेट मिळवून दिली. ही अर्शदीपची सामन्यातील तिसरी विकेट असून, न्यूझीलंड अडचणीत असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडची धावसंख्या ८ गडी बाद १३५ आहे.

अर्शदीप सिंगने ग्लेन फिलिप्सला (३०) मिड-ऑफमध्ये श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करून न्यूझीलंडला ३५.१ षटकांत ९ गडी बाद १४६ धावसंख्येवर नववी विकेट मिळवून दिली. ही अर्शदीपची सामन्यातील चौथी विकेट होती. १० व्या विकेट्ससाठी मात्र डफी आणि टिकनरने चांगली भागीदारी केली आणि न्यूझीलंडच्या आशा जागृत ठेवल्या होत्या मात्र, गुरनूर ब्रारने ही जोडी फोडली. या जोडीने शेवटच्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. 

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Ind vs nz india needs runs to win 1st odi against new zealand dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND vs NZ: पापणी लवण्याआधीच कमालीचा झेल, गुरनूर ब्रारचा धमाका; वीजेपेक्षा जलद वेगाने पकडला चेंडू, Video Viral
1

IND vs NZ: पापणी लवण्याआधीच कमालीचा झेल, गुरनूर ब्रारचा धमाका; वीजेपेक्षा जलद वेगाने पकडला चेंडू, Video Viral

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडियाने जिंकले नाणेफेक; गोलंदाजीचा घेतला निर्णय
2

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडियाने जिंकले नाणेफेक; गोलंदाजीचा घेतला निर्णय

IND Vs NZ: फक्त १०५ धावा अन् शुभमन गिल रचणार इतिहास! न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या विक्रमाची संधी
3

IND Vs NZ: फक्त १०५ धावा अन् शुभमन गिल रचणार इतिहास! न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या विक्रमाची संधी

Rishabh Pant न्यूझीलंडच्या विमानात बसणार की नाही? फिटनेस टेस्टमध्ये अपयशी अन्…; 48 तासांमध्ये होणार निर्णय
4

Rishabh Pant न्यूझीलंडच्या विमानात बसणार की नाही? फिटनेस टेस्टमध्ये अपयशी अन्…; 48 तासांमध्ये होणार निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.