IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; गोलंदाजीचा घेतला निर्णय
ऑकलंड : एकदिवसीय सामन्यांच्या मालिका सुरु झाली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेण्यामागचं कारण स्पष्ट केलं. आता पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. ही मालिका आजपासून सुरु झाली आहे. मात्र, भारताच्या अननुभवी गोलंदाजीमुळे न्यूझीलंडची स्थिती अधिक चांगली दिसत आहे.
एकदिवसीय मालिकेनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे, तर प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. यामुळे, अनुभवी मोहम्मद सिराजवर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे. सिराज व्यतिरिक्त, भारतीय संघातील इतर चार विशेषज्ञ गोलंदाज अर्शदीप सिंग (१८), गुरनूर ब्रार (९), अंशुल कंबोज आणि आकिब नबी (प्रत्येकी १) हे असणार आहेत. या सर्वांचा एकूण २९ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. टौरंगा येथे होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर लगेचच कसोटी मालिका सुरू होणार असल्याने, भारताचे काही स्टार खेळाडू शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नाहीत.
एकदिवसीय मालिका १५ नोव्हेंबरला संपेल आणि पहिला कसोटी सामना १९ नोव्हेंबरला वेलिंग्टन येथे खेळला जाईल. कर्णधार शुभमन गिलसुद्धा कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शेवटचे दोन एकदिवसीय सामने खेळणार नाही.
रोहित आणि कर्णधार गिल डावाची सुरुवात
एकदिवसीय सामन्यांमधील भारताचे पहिले पाच फलंदाज जवळपास निश्चित आहेत. रोहित आणि कर्णधार गिल डावाची सुरुवात करतील. त्यांच्यापाठोपाठ कोहली आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीला येतील. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज के. एल. राहुल पाचव्या क्रमांकावर असणार आहे.
भारत वेगवान गोलंदाजी विभागात कमकुवत
भारत वेगवान गोलंदाजी विभागात कमकुवत आहे, तर न्यूझीलंडचा संघ बहुतांशी वयस्कर आहे. त्यांच्या एकदिवसीय संघाचे सरासरी वय ३४ ते ३५ च्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत, कर्णधार मिचेल सँटनरने संकेत दिले आहेत की, २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक अनेक खेळाडूंसाठी शेवटची स्पर्धा ठरू शकते.
प्रश्न 1: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कोणता सामना सुरू झाला?
उत्तर: दोन्ही संघांमधील पहिला एकदिवसीय (वनडे) सामना सुरू झाला.
प्रश्न 2: पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक कोणी जिंकली?
उत्तर: भारतीय संघाने नाणेफेक जिंकली.
प्रश्न 3: भारताने नाणेफेक जिंकून कोणता निर्णय घेतला?
उत्तर: भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.






