IND vs PAK Final: Arshdeep Singh's unique game of trolling! Pakistan players were insulted; Watch the video
IND VS PAK Asia Cup 2025 Final : आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद जिंकले. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा तिसऱ्यांदा पराभव केला. या सामन्यादरम्यान फिरकी गोलंदाज अबरार अहमद पुन्हा एकदा त्याच्या अनोख्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. संजू सॅमसनची विकेट घेतल्यानंतर, त्याने त्याच्या ट्रेडमार्क डोळ्यांसमोर आनंद साजरा केला, परंतु हा सेलिब्रेशन पुन्हा एकदा त्याच्या संघाच्याच अंगलट आले.
जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळला जातो. त्या सामन्यात अबरार भारताविरुद्ध त्याचे वेगळे सेलिब्रेशन करत असतो आणि तेव्हा तेव्हा पाकिस्तानच्या वाटी पराभव येतो. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलला बाद केल्यानंतर त्याने याच पद्धतीने सेलिब्रेशन केले होते. परंतु भारताने त्या सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला होता.
यावेळी कथा काही वेगळी आहे असे म्हणता येणार नाही.अंतिम सामन्यात संजू सॅमसनला २४ धावांवर बाद केल्यानंतर, अबरारने डोळे मिचकावले आणि सॅमसनला बहेर जाण्याचा इशारा केला आणि भारताने ५ विकेट्सने सामना खिशात टाकला. भारतीय संघाच्या खेळाडूंकडून सामन्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनची नक्कल करून अबरारची खिल्ली उडवण्यात आली. अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि जितेश शर्मा यांनी त्याच्या शैलीची नक्कल केली, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Abrar Ahmed’s Action 🤡 Sanju Samson and his friends Reaction🤣pic.twitter.com/VGpKnK4m9G — CricSachin (@Sachin_Gandhi7) September 29, 2025
विशेष गोष्ट म्हणजे, अबरार अहमदने लीग स्टेज (१४ सप्टेंबर) आणि सुपर ४ सामन्यांमध्ये (२१ सप्टेंबर) हा उत्सव साजरा केला नाही. कदाचित त्याला याचा अंदाज असेल की, हे त्याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. २३ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या सुपर ४ सामन्यात त्याने श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीची नक्कल केली होती, ज्याला हसरंगाने सामन्यादरम्यान दोनदा अबरारची नक्कल करून प्रतिउत्तर दिले होते.
आशिया कपचा अंतिम सामना जिंकल्यानंतर अर्शदीप सिंगकडून पाकिस्तानला अनोख्या पद्धतीने ट्रोल करण्यात आले. पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्यादरम्यान, एका प्रेझेंटरने सामन्यानंतर वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलला विचारले, “अंतिम सामन्यात तू कसा कामगिरी करशील?” त्यानंतर, भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आशिया कप जिंकल्यानंतर अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांच्यासोबत असाच एक व्हिडिओ बनवण्यात आला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होऊ लागला आहे.
This is Gold 😍 Jitesh, Arshdeep and Harshit doing Abrar’s celebration 😂#indvspak2025 #AsiaCupFinal #tilak pic.twitter.com/ETzHH9L9vw — Globally Pop (@GloballyPop) September 28, 2025
हेही वाचा : स्मृती मानधना Women’s World Cup मध्ये पाडेल धावांचा पाऊस! करेल नवनवीन विक्रम; वाचा सविस्तर
या आशिया कपमधील ऐतिहासिक विजयासह, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० स्वरूपात आशिया कपचे जेतेपद जिंकले आहे. भारताने यापूर्वी २०१६ आणि २०२२ मध्ये विजेतेपदावर नाव कोरले होते.
ENTERTAINERS 😂🔥#AsiaCup2025 pic.twitter.com/QM3B8qph2d — Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 28, 2025