भारतीय संघाने आशिया कप जिंकला(फोटो-सोशल मीडिया)
IND VS PAK Asia Cup 2025 Final : रविवारी, २८ सप्टेंबर रोजी आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले. भारताकडून तिलक वर्मा, कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांनी शानदार कामगिरी करत या विजयात मोठे योगदान दिले. भारतीय संघाने या सामन्यात संयम आणि आक्रमकतेचे परिपूर्ण मिश्रण दाखवून दिले.
पाकिस्तानविरुद्धच्या या विजयासह, भारताने टी२० क्रिकेटमध्ये एक नवीन विश्वविक्रम स्थापन केला आहे. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना १००% विजय मिळवण्याचा विक्रम असलेला टीम इंडिया आता सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध हा भारताचा सलग नववा विजय असून या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने कधीही पराभव पत्करलेला नाही. त्या तुलनेत, मलेशियाचा थायलंडविरुद्ध १००% विजयाचा विक्रम राहीला आहे, त्याने आठ सामने जिंकले आहेत, परंतु भारताचा विक्रम यापेक्षा प्रभावी ठरतो.
भारतीय क्रिकेट संघाने आशिया कपमध्ये एकूण ५० सामने (टी-२० आणि एकदिवसीय दोन्ही) जिंकून आणखी एक विक्रम केला आहे. भारताने आशिया कप एकदिवसीयमध्ये ३५ सामने आणि आशिया कप टी-२० मध्ये १५ सामने जिंकून हा ऐतिहासिक विक्रम रचल आहे. यापूर्वी कोणत्याही संघाने हा कारनामा केलेला नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने चार षटकांत फक्त ३० धावा मोजत ४ विकेट्स चटकावल्या. त्याच्या कामगिरीने पाकिस्तानी फलंदाजीकहा कणाच मोडला गेला. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी देखील ही शानदार गोलंदाजी करून संघाला विजयापर्यंत नेले. त्यांच्या योगदानाने भारताचा विजय सुकर झाला.
धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची चार ओव्हरमध्ये ३ विकेट्स २० अशी अवशत झाली असताना तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने शानदार फलंदाजी केली. तिलक वर्माने ५३ चेंडूत ६९ धावा केल्या आहेत. त्याच्या योगदानामुळे भारताला सामन्यावर पकड निर्माण करता आली आणि अंतिम सामन्यात विजय निश्चित करता आला. वर्माच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा देऊन सन्मानित करण्यात आले.