
IND VS PAK, Hong Kong Sixes 2025: India beat Pakistan by 2 runs! Varun Raja's arrival turns the match around
IND VS PAK, Hong Kong Sixes 2025 : हाँगकाँग सिक्स २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानला सामना सहज जिंकता आला असता, परंतु मोंग कोकमध्ये पावसामुळे डकवर्थ-लुईस पद्धतीने भारताने २ धावांनी विजय मिळवण्यात यश मिळवले. ८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान चांगल्या लयीत दिसत होता, पाकिस्तानच्या तीन षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ४१ धावा केल्या होत्या, परंतु मुसळधार पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आणि सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि डकवर्थ-लुईस पद्धतीने निकाल लावण्यात आला. या नियमानुसार, पाकिस्तान भारतापेक्षा २ धावांनी राहिला आणि परिणामी पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा : ‘मी टू बॉम्ब’ ने क्रीडा जगतात खळबळ! बांगलादेशातील महिला क्रिकेटपटूंचा लैंगिक छळ; विशेष समिती स्थापन
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने दिलेल्या सहा षटकांत केवळ ८६ धावा केल्या. भारताकडून रॉबिन उथप्पाने ११ चेंडूत सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. त्याने या खेळीत ३ षटकार आणि २ चौकार मारले. भरत चिपलीने १३ चेंडूत २४ धावा केल्या. त्यात त्याने २ षटकार आणि २ चौकार लगावले. दिनेश कार्तिकने देखील ६ चेंडूत नाबाद १७ धावा फटकावल्या. ज्यामध्ये त्याने १ षटकार आणि २ चौकार लगावले. पाकिस्तानकडून सर्वात यशस्वी गोलंदाज मोहम्मद शहजाद ठरला. त्याने एका षटकात १५ धावांत २ बळी टिपले. अब्दुल समदने १६ धावांत १ बळी घेण्यात यश मिळवले. शाहिद अझीझने एका षटकात १३ धावा दिल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज माझ सदाकतने दोन षटकांत फक्त १९ धावा दिल्या.
स्टुअर्ट बिन्नी फलंदाजीत खास काही करू शकला नाही. परंतु त्याने चेंडूने उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानला आढकणीत आणले. स्टुअर्ट बिन्नी या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने त्याचे दुसरे षटक टाकले, यामध्ये त्याने फक्त ७ धावांत एक बळी टिपला. या षटकात त्याने माझ सदाकतची विकेट काढली. या षटकामुळे पावसानंतर पाकिस्तानची धावसंख्या भारतापेक्षा २ धावांनी राहिली आणि भारताने विजय मिळवला.
पाकिस्तानचा संघ : ख्वाजा नाफे, अब्दुल समद, माझ सदाकत, शाहिद अझीझ, अब्बास आफ्रिदी आणि मोहम्मद शहजाद.
भारताचा संघ : दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, स्टुअर्ट बिन्नी, अभिमन्यू मिथुन, भरत चिपली आणि शाहबाज नदीम.