IND vs PAK: What is the record of India and Pakistan in the Asia Cup? India's lead in the T20 format
IND vs PAK : भारताने इंग्लंड दौऱ्यात पाच समन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरीबरीत सोडवली आहे. त्यानंतर भारत आता 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025 च्या तयारीला लागला आहे. आशिया कप 9 सप्टेंबरपासून ते 28 पर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी ही स्पर्धा T20 स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी आशिया कप दोनदा T20 स्वरूपात खेळला गेला होता. यावेळी T20 आशिया कप दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. जो BCCI आयोजित करत आहे.
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहे. 14 सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नेहमीच नेहमीच संघर्षपूर्ण सामना बघायाल मिळत असतो. दोन्ही संघ कोणत्याही स्पर्धेत खेळत असले तरी जगभरातील चाहते या सामन्यांसाठी गर्दी करत असतात.
भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी20 स्वरूपात पाकिस्तानवर नहेमीच वर्चस्व गाजवले आहे. आशिया कप दरम्यान देखील हीच परिस्थिति दिसून येते. बऱ्याच काळापासून भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी20 स्वरूपात पाकिस्तानवर आपला दबदबा ठेवला आहे. यापूर्वी 2016 आणि 2022 मध्ये आशिया कप टी-20 स्वरूपात खेळवण्यात आला होता. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये एकूण तीन सामने खेळले गेले होते.
आशिया कपचा फॉरमॅट सहसा त्या वर्षी होणाऱ्या आयसीसी स्पर्धेच्या फॉरमॅटवर आधारित असतो. 2026 मध्ये टी-20 वर्ल्ड कप प्रस्तावित असल्याने, २०२५ चा आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी, 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, त्याच वर्षीचा आशिया कप एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळवला गेला होता.
2016 मध्ये खेळवण्यात आलेल्या टी-20 फॉरमॅटमधील आशिया कपमध्ये भारताने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरले होते. त्याच वेळी, 2022 मध्ये, श्रीलंकेने टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आलेला आशिया कप जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. आशिया कपच्या एकूण 16 आवृत्त्या खेळवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये एकदिवसीय आणि टी-20 या दोन्ही स्वरूपांचा समावेश आहे. आशिया कपमध्ये भारतीय संघ सर्वात यशस्वी ठरला आहे, त्याने आतापर्यंत 8 वेळा आशिया कपचे विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.