
IND vs SA 1st ODI: ICC slams 'this' Indian bowler! South Africa's Devald Brevis suffers costly injury blow
ICC reprimands Harshit Rana : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या हर्षित राणाला आयसीसीने फटकारा लागवला आही. रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ उल्लंघन केल्याबद्दल हर्षित राणाला फटकरण्यात आले आहे. आयसीसीने हर्षित राणाला खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे.
हेही वाचा : IND vs SA 2nd ODI : टॉस जिंकून दक्षिण आफ्रिका करणार गोलंदाजी! टीम इंडियाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी
भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाला आयसीसीकडून कलम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. जे खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना लागू होते. या कलमामध्ये “आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यानंतर त्याला अपमानित किंवा आक्रमक प्रतिक्रिया भडकवू शकेल अशी भाषा, कृती किंवा हावभाव वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.”
दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या २२ व्या षटकामध्ये राणा गोलंदाजी करत होता. त्याने देवाल्ड ब्रेव्हिसला बाद केल्यानंतर ड्रेसिंग रूमकडे इशारा केला. तेव्हा हा प्रकार घडला. ज्यामुळे फलंदाजाकडून देखील आक्रमक प्रतिक्रिया येऊ शकते. या कृतीमुळे राणाच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जमा झाला आहे. जो गेल्या २४ महिन्यांतील त्याचा पहिला गुन्हा होता.
हर्षित राणाने आयसीसी नियमांचे उल्लंघन केल्याचे कबूल केले आहे आणि मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी शिफारस केलेली शिक्षा स्वीकारली आहे. यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही. मैदानावरील पंच जयरामन मदनगोपाल आणि सॅम नोगाज्स्की, थर्ड अंपायर रॉड टकर आणि फोर्थ अंपायर रोहन पंडित यांनी आरोप लावले होते. लेव्हल १ उल्लंघनात किमान फटकार, मॅच फीच्या जास्तीत जास्त ५० टक्के दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट यांची शिक्षा नमूद आहे. या नियमानुसार हर्षित राणाला फटकार आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण लेले. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी संघाला २००/४ पर्यंत पोहोचवले. विराट कोहलीने १३५ धावांच्या खेळी केली. केएल राहुलनेही ५६ चेंडूत ६० धावांचे योगदान दिले, तर रोहित शर्माने ५१ चेंडूत ५७ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. भारतीय फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारताने ३४९ धावा उभ्या केल्या.
भारताने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा दक्षिण आफ्रिकन संघ ३३२ धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून च्या संघाकडून मॅथ्यू ब्रिट्झके (७२), मार्को जॅन्सेन (७०) आणि कॉर्बिन बॉश (६७) यांनी अर्धशतके झळकावली. मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. परिणामी संघाला १७ धावांनी पराभव पत्करावा लगाला.
हेही वाचा : IND VS SA : ‘गौतम गंभीर सर्वोत्तम प्रशिक्षक…’अफगाणिस्तानच्या ‘या’ स्टार खेळाडूने उधळली स्तुतीसुमने