Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणमध्ये भारताचा ‘यशस्वी’ विजय; दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत मालिकेवर 2-1 ने केला कब्जा 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट्स विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेवर २-१ असा कब्जा केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 06, 2025 | 09:26 PM
IND vs SA 3rd ODI: India's 'successful' victory in Visakhapatnam; Defeats South Africa to clinch the series 2-1

IND vs SA 3rd ODI: India's 'successful' victory in Visakhapatnam; Defeats South Africa to clinch the series 2-1

Follow Us
Follow Us:

India vs South africa 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या  एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ९ विकेट्स विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेवर २-१ असा कब्जा केला आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजी करत  २७० धावा उभ्या केल्या होत्या. भारताने यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या जोरावर २७१ धावांचे लक्ष्य गाठले. भारताने ६१ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजी करण्यास मैदानात उतरला. दक्षिण आफ्रिकेने सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर 270 धावा केल्या.क्विंटन डी कॉकने ८९ चेंडूत १०६ धावा काढल्या. या खेळीत ८ चौकार आणि ६ षटकार खेचले. क्विंटन डी कॉक व्यतिरिक्त कर्णधार टेम्बा बावुमाने देखील ४८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.  इतर फलंदाज मात्र आपली छाप पाडू शकले नाहीत. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. तर जडेजा आणि र्शदीप सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट काढली.

यशस्वी जयस्वालचे शानदार शतक आणि भारताचा विजय

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ३७१ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात दिमाखदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने पहिल्या विकेट्ससाठी १५५ धावांची भागीदारी रचली. या दरम्यान यशस्वी आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतके ठोकली.  अर्धशतक केल्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसणारा रोहित शर्मा ७५ धावा काढून बाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्याला केशव महाराजने बाद केले. त्यानंतर यशस्वी आणि विराट कोहली यांनी डाव सांभाळला. दरम्यान यशस्वी जयस्वालने एकदिवसीय कारकीर्दीतील आपले पहिले शतक पूर्ण केले. यशस्वी जयस्वालने १११ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तर दुसऱ्या बाजूने विराट कोहली शानदार फटकेबाजी करत होता. या दोघांनी ११६ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताला शानदार विजय मिळवून दिला. यशस्वी जयस्वालने  १२१ चेंडूत नाबाद  ११६ धावा केल्या. त्याने या खेळीत १२ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर विराट कोहलीने या मालिकेतील सलग ३ रे अर्धशतक ठोकले. तो ४५ चेंडूत ६५ धावा करून नाबाद राहिला. या दरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार लगावले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजला एकमेव विकेट मिळाली.

भारतीय संघाची तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, प्रसिद्ध कृण्षा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि र्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका संघाची तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11

एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, रायन रिकेल्टन, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, ओथनील बार्टमन, लुंगी एनगिडी.

Web Title: Ind vs sa 3rd odi india beat south africa by 9 wickets in visakhapatnam to win the series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • 3rd ODI
  • Ind Vs Sa
  • Virat Kohli
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
1

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Vaibhav Sooryavanshi: ‘मला फक्त खेळायचं नाही तर 10-20 वर्षे…’.; वैभवने सांगितला भविष्याचा प्लॅन
2

Vaibhav Sooryavanshi: ‘मला फक्त खेळायचं नाही तर 10-20 वर्षे…’.; वैभवने सांगितला भविष्याचा प्लॅन

IND vs AFG: विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर; अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी ‘या’ युवा खेळाडूला संधी
3

IND vs AFG: विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर; अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी ‘या’ युवा खेळाडूला संधी

Virat Kohli: टीम इंडियाला मोठा झटका; अफगाणिस्ताननंतर इंग्लंड मालिकेलाही किंग कोहली मुकणार? रिपोर्टमुळे खळबळ
4

Virat Kohli: टीम इंडियाला मोठा झटका; अफगाणिस्ताननंतर इंग्लंड मालिकेलाही किंग कोहली मुकणार? रिपोर्टमुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.