
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India vs South africa 3rd ODI Toss Update : भारताच्या संघासमोर सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये आज जिंकणे गरजेचे आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला होता तर दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आणि विजय मिळवून मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता हा तिसरा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ मालिका जिंकणार आहे. त्याआधी मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये देखील टॅास महत्वाचा आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये केएल राहुल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आणखी एकदा टेम्बा बवुमाने नाणेफेक गमावले आहे. भारताच्या संघाने 20 टाॅस मागील हरले होते, म्हणजेच जवळजवळ दोन वर्षानंतर भारताने टाॅस जिंकला आहे. मागील सामन्यामध्ये भारताच्या खेळाडूंकडून अनेक चुका झाल्या होत्या. यामध्ये फिल्डिंगवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
🚨 Toss 🚨#TeamIndia have won the toss and elected to field first. Updates ▶️ https://t.co/HM6zm9o7bm#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vYNPSa1iKF — BCCI (@BCCI) December 6, 2025
भारताच्या संघाने आजच्या सामन्यामध्ये एक बदल केला आहे. वाॅशिंग्टन सुंदर याला बाहेर करण्यात आले आहे तर त्याच्या जागेवर तिलक वर्मा याला भारतीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे दोन खेळाडू हे संघाबाहेर झाले आहेत. यामध्ये टोनी डी जिओर्गी, नंद्रे बर्गर यांना दुखापतीमुळे संघ सोडावा लागला आहे. त्याच्या जागेवर रायन रिकेल्टन, ओथनील बार्टमन यांना बाहेर करण्यात आले आहे.
ही एकदिवसीय मालिका झाल्यानंतर भारताचा संघ टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेमध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत. सुर्यकुमार यादव या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, प्रसिद्ध कृण्षा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.
एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, रायन रिकेल्टन, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, ओथनील बार्टमन, लुंगी एनगिडी.