Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 4th T20I : जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! रागात चाहत्याचा फोन घेतला हिसकावून; VIDEO VIRAL 

भारतीय वेगवान गोलंदाज  जसप्रीत बुमराह रागावलेला दिसुन आला आहे.  बुमराह इतका रागावला आहे की त्याने फोन हिसकावून घेतला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 18, 2025 | 11:22 AM
IND vs SA 4th T20I: Jasprit Bumrah lost his temper! He angrily snatched a fan's phone; VIDEO VIRAL

IND vs SA 4th T20I: Jasprit Bumrah lost his temper! He angrily snatched a fan's phone; VIDEO VIRAL

Follow Us
Close
Follow Us:

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौता सामना  लखनौमध्ये खेळला जाणार होता, परंतु, धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे सामना रद्द करावा लागला.  दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज  जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रागावलेला दिसुन येत आहे.  बुमराह इतका रागावला आहे की त्याने फोन हिसकावून घेतला आहे. बुमराहशी संबंधित घटनेचा हा व्हिडिओ विमानतळावरील असून तो रांगेत उभा असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याला धुक्याचा फटका! दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामना अखेर रद्द

नेमकं काय घडलं?

आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, चाहत्याने बुमराहसोबत काय केले म्हणुन तो चिडला होता? खरं तर, चाहता विमानतळावर रांगेत उभा होता. जेव्हा त्याला बुमराह त्याच्या शेजारी रांगेत दिसुन आला  तेव्हा त्याने परवानगीशिवाय त्याचा सेल्फी व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. तेव्हा बुमराहने सुरुवातीला चाहत्याला असे करण्यापासून रोखले आणि व्हिडिओ न घेण्याचा इशारा देखील दिला. पण जेव्हा त्याने त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा बुमराहने त्याचा संयम गमावला आणि त्याचा फोन हिसकावून फेकून देण्यातचे कृत्य केले.

What an arrogant behavior by Jasprit Bumrah. First he threatened his fan that he would throw his phone, and later he snatched the fan’s phone. pic.twitter.com/O2e4jSLw7s — 𝐆𝐨𝐚𝐭𝐥𝐢𝐟𝐢𝐞𝐝 👑 (@Goatlified) December 17, 2025

हेही वाचा : IND vs SA 4th T20I : लखनौमधील चौथ्या T20 सामन्यावर धुक्याचे सावट! सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड

बुमराह टी२० मालिकेत टीम इंडियाचा भाग

जसप्रीत बुमराह सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चालू टी२० मालिकेत टीम इंडियाचा महत्वाचा  भाग आहे. कटकमध्ये खेलवण्यात आलेल्या पहिल्या टी२० सामन्यात  त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. मुल्लानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० मध्ये मात्र त्याला  विकेट घेता आली नाही. जसप्रित बुमराह वैयक्तिक कारणांमुळे धर्मशाळेत तिसऱ्या टी२० मध्ये खेळू शकला नव्हता. लखनौमध्ये खेळला जाणारा चौथा टी२० सामना रद्द करण्यात आला असून  मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी२० सामना आता १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

चौथा टी२०  सामना रद्द

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील आज चौथा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता.  परंतु, हा सामना रद्द करण्यात आला आहे.  सामना रद्द करण्यामागील मुख्य कारण म्हणजे लखनौमध्ये पसरलेले दाट धुके, ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली आणि अखेर पंचांना हा सामना रद्द करावा लागला.

Web Title: Ind vs sa 4th t20i jasprit bumrah angrily snatched a fans phone video viral marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Jaspreet Bumrah
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याला धुक्याचा फटका! दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामना अखेर रद्द 
1

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याला धुक्याचा फटका! दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामना अखेर रद्द 

IND vs SA 4th T20I : लखनौमधील चौथ्या T20 सामन्यावर धुक्याचे सावट! सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड 
2

IND vs SA 4th T20I : लखनौमधील चौथ्या T20 सामन्यावर धुक्याचे सावट! सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड 

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याआधी भारताला झटका! संघातील स्टार खेळाडू संघाबाहेर; कारण आले समोर 
3

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याआधी भारताला झटका! संघातील स्टार खेळाडू संघाबाहेर; कारण आले समोर 

ICC Ranking : सूर्याच्या साम्राज्याला ‘तिलक’ धोका! ICC रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप 
4

ICC Ranking : सूर्याच्या साम्राज्याला ‘तिलक’ धोका! ICC रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.