
IND vs SA 4th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील आज चौथा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु, हा सामना ठरलेल्या वेळेवर खेळवण्या येऊ शकला नाही. अद्याप नाणेफेक देखील होऊ शकेलेली नाही. उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे लखनौमध्ये पसरलेले दाट धुके, ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. परिस्थिती अशी आहे की मैदानावरील खेळाडू आणि क्षेत्ररक्षकांना एकमेकांना पाहण्यास त्रास जाणवत आहे. होत आहे. या कारणास्तव, पंचांनी सध्या सामना सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचे लक्ष मालिकेत आघाडीघेण्याकडे असणार आहे तर पाहुणा संघ मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
सध्या उत्तर भारतात हिवाळ्याचे परिणाम जाणवत आहेत. त्याला आता लखनौही त्याला अपवाद राहिलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे. १७ डिसेंबर रोजी लखनौमध्ये किमान तापमान ११ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून आधीच धुक्याचा इशारा जारी करण्यात आला होता, ज्याचा आता सामन्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
दोन वर्षांनी शाहबाजचे पुनरागमन
लखनऊ येथे होणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी शाहबाज अहमदला अक्षर पटेलच्या जागी संघात घेतले आहे. शाहबाजचे दोन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याने भारतासाठी शेवटचा टी२० सामना ऑक्टोबर २०२३ मध्ये खेळला होता. शाहबाज अहमदने आतापर्यंत ३ एकदिवसीय आणि २ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
हेही वाचा : ICC Ranking : सूर्याच्या साम्राज्याला ‘तिलक’ धोका! ICC रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप
वाचा दोन्ही संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद
दक्षिण आफ्रिकाः एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेड्रिक्स, देवाल्ड बुविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डोनोवन फरेरा, माकों जानसेन, लुथो सिपामला, ओटनील बार्टमन, अॅरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, केशव महाराज आणि जॉर्ज लिंडे.