Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 5th T20I: अहमदाबादमध्ये संजू सॅमसन रचणार इतिहास? ‘ही’ गोष्ट करताच या दिग्गजांच्या क्लबमध्ये करणार एंट्री  

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज १९ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल. या सामन्यात संजू सॅमसन जर खेळला तर त्याला खास कामगिरीची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 19, 2025 | 03:36 PM
IND vs SA 5th T20I: Will Sanju Samson make history in Ahmedabad? By doing this one thing, he will enter this club of legends.

IND vs SA 5th T20I: Will Sanju Samson make history in Ahmedabad? By doing this one thing, he will enter this club of legends.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs SA 5th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील  पाचवा आणि मालिकेतील शेवटचा सामना आज १९ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. लखनऊ येथील एकाना स्टेडियमवरील सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. भारतीय संघ सध्या मालिकेत २-१ ने आघाडीवर असून भारत आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवणार आहे. शुभमन गिल या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. जर गिलला वगळण्यात आले तर त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात येऊ दिली जाऊ शकते. या सामन्यात जर संजू खेळला तर त्याला एक विक्रमाची संधी असणार आहे.

हेही वाचा : Ashes 2025 : अ‍ॅडलेडमध्ये Travis Head चे ऐतिहासिक शतक! ‘हा’ पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू 

संजू सॅमसनला खास संधी

जर संजू सॅमसन या सामन्यात खेळला आणि चार धावा केल्या तर तो एका खास क्लबमध्ये एंट्री करणार आहे. खरं तर, संजू सॅमसन टी-२० मध्ये ८,००० धावांचा टप्पा गाठण्यापासून केवळ चार धावा दूर आहे. संजूने ३१९ टी-२० सामन्यांमध्ये ३०२ डावांमध्ये ३०.०६ च्या सरासरीने आणि १३६.७५ च्या स्ट्राईक रेटने ७९९६ धावा फटकावल्या आहेत.

या काळात त्याने ६ शतके आणि ५१ अर्धशतके लगावली आहेत. आतापर्यंत फक्त विराट कोहली (१३५४३), रोहित शर्मा (१२२४८), शिखर धवन (९७९७), सूर्यकुमार यादव (८९७०), सुरेश रैना (८६५४) आणि केएल राहुल (८१२५) यांनीच भारतासाठी हा टप्पा पार केला आहे. आता ही संजू सॅमसनला ही संधी असणार आहे.

अहमदाबादमध्ये भारत नेहमीच प्रभावी राहिलेला आहे. या मैदानावर ७ टी २० सामने खेळले गेले आहेत. यापैकी ५ सामने भारताने जिंकले आहेत. तर दोन सामन्यात इंग्लंड संघाने भारताला पराभूत केले आहे. या विक्रमाच्या आधारे टीम इंडियाला अहमदाबादमध्ये मालिका जिंकण्याची संधी असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : श्रीलंकेने खेळला डाव! T20 World Cup साठी संघ जाहीर! वाचा कुणाची लागली लॉटरी?

 भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव(कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, हर्षित राणा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

Web Title: Ind vs sa 5th t20i sanju samson has a chance to create history in ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Sanju Samson
  • T20 cricket

संबंधित बातम्या

India Squad, T20 World Cup 2026 : या दिवशी होणार टीम इंडियाची विश्वचषकासाठी घोषणा, न्यूझीलंड मालिकेसाठी निवडही होणार
1

India Squad, T20 World Cup 2026 : या दिवशी होणार टीम इंडियाची विश्वचषकासाठी घोषणा, न्यूझीलंड मालिकेसाठी निवडही होणार

IND vs SA Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोण वर्चस्व गाजवेल? कोणाचे नशीब चमकणार जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
2

IND vs SA Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोण वर्चस्व गाजवेल? कोणाचे नशीब चमकणार जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमधील पाचव्या T20I सामन्यावर ‘रद्द’ चे सावट? जाणून घ्या हवामान अहवाल
3

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमधील पाचव्या T20I सामन्यावर ‘रद्द’ चे सावट? जाणून घ्या हवामान अहवाल

IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य! आगामी मालिकांच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणार 
4

IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य! आगामी मालिकांच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.