ट्रॅव्हिस हेड(फोटो-सोशल मीडिया)
Travis Head’s historic century : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची प्रतिष्ठेची अॅशेस मालिका सुरू आहे, या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सालामीवीर ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावून इतिहास रचला आहे. या शतकासह, हेड एकाच ऑस्ट्रेलियन मैदानावर सलग चार कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : श्रीलंकेने खेळला डाव! T20 World Cup साठी संघ जाहीर! वाचा कुणाची लागली लॉटरी?
या ऐतिहासिक कामगिरीसह, ट्रॅव्हिस हेड आता डॉन ब्रॅडमन, मायकेल क्लार्क आणि स्टीव्ह स्मिथ सारख्या महान खेळाडूंच्या पकस्तीत जाऊन बसला आहे. ३१ वर्षीय हेड ऑस्ट्रेलियन भूमीवर सलग चार कसोटी शतके झळकवण्याची किमया साधणारा इतिहासातील पाचवा फलंदाज बनला आहे.
अॅडलेड ओव्हलवर ट्रॅव्हिस हेडने १४६ चेंडूत शतक पूर्ण केले. हे हेडचे हे ११ वे कसोटी शतक ठरले असून तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी, ट्रॅव्हिस हेडने १९६ चेंडूंचा सामना करत १४२ धावा केल्या. त्याने १३ चौकार आणि २ षटकार मारले. त्याला अॅलेक्स कॅरीची साथ मिळत आहे, त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात ४ बाद २७१ धावा करून ३५६ धावांची आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३७१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडू पहिल्या डावा त अॅलेक्स कॅरीच्या १०६, उस्मान ख्वाजाच्या ८२ आणि मिशेल स्टार्कच्या ५४ धावांची खेळी केली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३७१ धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ५, ब्रायडन कार्स आणि विल जॅक्सने प्रत्येकी २ बळी टिपले. तर जोश टँगने १ बळी घेण्यात यश मिळवले.
यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला सुरुवातीलाच धक्के बसले आहेत. तथापि, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरने ९व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केल्याने संघाला २८६ धावा करता आल्या. बेन स्टोक्सने ८३, तर जोफ्रा आर्चरने ५१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. बेन डकेटने २९, जो रूटने १९, हॅरी ब्रूकने ४५ आणि जेमी स्मिथने २२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ बळी आणि स्कॉट बोलँडने ३ बळी टिपले, तर लायनने २ विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि ग्रीनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात देखील आपल्या प्रभावी फलंदाजीचे दर्शन घडवले. तिसऱ्या दिवससाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४ बाद २७१ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड १४२ आणि अॅलेक्स कॅरी ५२ धावांवर नाबाद राहिले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा ४०, मार्नस लाबुशेन १३ आणि कॅमेरॉन ग्रीन ७ धावा फटकावल्या. इंग्लंडकडून जोश टोंगने दोन बळी टिपण्यात यश मिळवले.






