
IND vs SA: BCCI in trouble due to Virat Kohli's 'that' decision! But Rohit Sharma gave a nod
Virat Kohli refuses to play in Vijay Hazare Trophy : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भविष्याबद्दल भारतीय ड्रेसिंग रूममध्ये मतभेद वाढत जात आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहली खेळणार नसल्याने यामध्ये यामध्ये अधिक भर पडली आहे. अशी चर्चा सुरू आहे की, फलंदाजाच्या भविष्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मतभेदांमुळे कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संबंध बिघडत आहेत. एका सूत्राने सांगितले की रोहित शर्माने आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीसमोर आपली उपस्थिती असल्याचे आधीच सांगितले आहे. परंतु विराट कोहलीनकडून स्थानिक एकदिवसीय स्पर्धेत भाग घेण्यास नकार दर्शवण्यात आला आहे.
हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : सरफराज खानची स्फोटक फलंदाजी! गोलंदाजांवर चढवला हल्लाबोल; निवडकर्त्यांना दिला इशारा
विराट कोहलीची नकाराची भूमिका रोहित शर्माच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्याच्या इच्छेच्या विरोधात आहे. त्याने त्याचा सामना फिटनेस राखण्यासाठी सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेसाठी देखील स्वतःला उपलब्ध करून दिले आहे. दुसरीकडे, कोहली मात्र अति तयारीच्या बाजूने दिसत नाही. त्यामुळे, बीसीसीआय कठीण परिस्थितीत सापडली आहे. कारण ते कोणत्याही खेळाडूला, अगदी विराट कोहलीच्या दर्जाच्या खेळाडूला देखील सूट देण्याच्या मानसिकतेत नाही.
एका सूत्राकडून सांगण्यात आले आहे की, “प्रश्न विजय हजारे ट्रॉफीचा असून विराट कोहली या स्पर्धेत खेळू इच्छित नाही. जेव्हा रोहित शर्मा देखील खेळत असतो, तेव्हा एका खेळाडूला अपवाद कसा असू शकतो? आणि आपण इतर खेळाडूंना काय सांगू? तुम्ही वेगळे आहात?” असे सूत्राकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : Ashes series 2025: इंग्लंडकडून अंतिम प्लेइंग इलेव्हनची घोषणा! 3 वर्षांनंतर ‘या’ खेळाडूला लागली लॉटरी
बीसीसीआय निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गंभीर हे सातत्याने उपलब्ध खेळाडूंना स्थानिक क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. खरं तर, ऑस्ट्रेलियातील खराब कसोटी मालिकेनंतर बीसीसीआयच्या आग्रहामुळे रोहित आणि कोहली दोघांनी देखील रणजी ट्रॉफीचे काही सामने खेळले आहेत.
इंग्लंड क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दोन संघात प्रतिष्ठित अॅशेस मालिका खेळवण्यात येत आहे. पहिली कसोटी इंग्लंडसाठी खूपच वाईट ठरली. पाहिला कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांतच संपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पाहुण्या संघाचा ८ विकेट्सने धुव्वा उडवण्यात आला. या दारुण पराभवानंतर, इंग्लंड आता दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन करण्याच्या इराद्यात आहे. ४ डिसेंबरपासून गॅब्बा येथे खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी, इंग्लंड संघ व्यवस्थापनाने नवीन प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.इंग्लंडकडू त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे बाहेर पडला असून त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू विल जॅक्सला संधी दिली गेली आहे.