सरफराज खान(फोटो-सोशल मीडिया)
Sarfaraz’s explosive knock in the Syed Mushtaq Ali Trophy : २०२५ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भारतीय खेळाडू आपला दम दाखवत आहेत. आयपीएल २०२६ चा लिलाव तोंडावर असताना खेळाडू आपल्या खेळीने लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, या स्पर्धेत मुंबईचा फलंदाज सरफराज खानने टी२० स्वरूपात स्फोटक फलंदाजी करत शतक ठोकले आहे. टी२० क्रिकेटमधील हे सरफराज खानचे पहिले शतक ठरले आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्य दाखवत शतकांची आतिषबाजी केली आहे.
मुंबई संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित करण्यात आले. सलामीवीर आयुष म्हात्रे झटपट बाद झाला. परंतु त्याने १४ चेंडूत २१ धावा करून चांगली सुरुवात केली. त्यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर येऊन, सरफराज खानने अजिंक्य रहाणेसह मुंबईला मजबूत स्थितीत पोहचवले. सरफराजने या सामन्यात फक्त ४७ चेंडूत त्याचे शतक लगावले त्याच्या खेळीत त्याने ८ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट २१२.७७ इतका होता.
हेही वाचा : Ind vs Sa odi series: ‘विराटच्या भविष्याबद्दल चिंता…’फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांचे विधान चर्चेत
सरफराज खान शतक झळकावल्यानंतर नाबाद परतला. त्याच्या स्फोटक कामगिरीमुळे मुंबईने २० षटकांत ४ बाद २२० धावांपर्यंत मजल मारली. तर अजिंक्य रहाणेने ३२ चेंडूत ४२ धावा कुटल्या. तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने १२ चेंडूत २० धावा फटकावल्या.
टी-२० मधील हे शतक सरफराजसाठी खूप महत्वाचे असणार आहे. या शतकामुळे आयपीएल लिलावात त्याची किंमत निश्चितच वाढणेची शक्यता आही. आयपीएलमधील त्याची कामगिरी आतापर्यंत सरासरी राहिली आहे. तर त्याच्या शानदार खेळीमुळे त्याच्या आयपीएलमध्ये शक्यता वाढल्या आहेत. जर सरफराजने हा फॉर्म कायम ठेवला तर आयपीएलमधील सर्वच संघ त्याला मिळवण्याचा प्रयत्न करण्यात पुढे असतील.
हेही वाचा : Ashes series 2025: इंग्लंडकडून अंतिम प्लेइंग इलेव्हनची घोषणा! 3 वर्षांनंतर ‘या’ खेळाडूला लागली लॉटरी
पहिले टी-२० शतक झळकावल्यानंतर सरफराज खानचा आत्मविश्वास वाढला असून येणाऱ्या सामन्यांमध्ये सर्वांच्या नजरा आता त्याच्याकडेच असणार आहेत. त्याचा आक्रमक दृष्टिकोन आणि फटकेबाजीची निवड स्पष्टपणे दर्शवते की तो भविष्यात भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता ठेवतो.






