
IND vs SA T20 series: Indian team announced for T20 series! 'These' players return, read who won the lottery?
आशिया कप २०२५ स्पर्धे दरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. त्याला पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात देखील खेळता आले नाही. तसेच दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चालू एकदिवसीय मालिकेमध्ये देखील विश्रांती देण्यात आली होती. तथापि, त्याला आता पूर्ण तंदुरुस्ती मिळवल्यानंतर ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. जो संघासाठी मोठा दिलासा मानण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानेला दुखापत झाल्यामुळे शुभमन गिल कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. तसेच संपूर्ण एकदिवसीय मालिकेसाठी देखील त्याला मुकावे लागले होते. आता, मात्र फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर, शुभमन गिल टी-२० संघात परतला आहे. त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
🚨 NEWS 🚨#TeamIndia‘s squad for the 5⃣-match T20I series against South Africa announced. Details ▶️ https://t.co/3Bscuq6Gri #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/0bHLCcbwTD — BCCI (@BCCI) December 3, 2025
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह सारखे तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील संघा सारखाच असल्याचे दिसत आहे. भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला आहे तो म्हणजे यावेळी नितीश कुमार रेड्डीला यावेळी संघात स्थान मिळू शकलेले नाही.
हेही वाचा : IND vs SA 2nd ODI : रायपुरमध्ये भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचे लक्ष्य! ऋतुराज-विराटची दमदार शतके
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.