
IND vs SA, T20 World Cup 2026: Who will be the boss in Ahmedabad? Batsman or bowler? Read the pitch report
IND vs SA, T20 World Cup 2026 : टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर ८ सामन्यांची सुरुवात झाली आहे. पहिला सुपर ८ सामना आज कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दूसरा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत शानदार कामगिरी करत आहे. साखळी सामन्यात अपराजित राहून संघाने सुपर ८ सामन्यात प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील भारतीय संघ आपला फॉर्म कायम रखण्यावर भर देणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेने गट टप्प्यातील त्यांचे सर्व सामने जिंकून सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघासाठी इशान किशन आणि सूर्यकुमार यादव फलंदाजीने सातत्याने दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. इशानने चार सामन्यांमध्ये २०२ च्या स्ट्राईक २०२ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत, तर सूर्यकुमार यादवने चार सामन्यांमध्ये एकूण १६२ धावा फटकावल्या आहेत. दरम्यान, वरुण चक्रवर्ती या स्पर्धेत आतापर्यंत विरोधी संघाच्या फलंदाजांसाठी एक कोडे ठरले आहे. वरुणने ४ सामन्यात एकूण ९ विकेट चटकावल्या आहेत.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्कराम या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याने आतापर्यंत ४ सामन्यात १७८ धावा केल्या आहेत, त्याचा स्ट्राईक रेट १८७ इतका आहे. तथापि, भारताविरुद्धच्या सामन्यात संघाला गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरील (टी२० विश्वचषक २०२६)खेळपट्टी ही फलंदाजांना अनुकूल आहे. अहमदाबादच्या मैदानावर चौकार आणि षटकारांचा वर्षाव होताना दिसून येतो. नेदरलँड्सविरुद्ध या मैदानावर खेळलेल्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने १७६ धावा केल्या आहेत. या मैदानावर पहिल्या डावात सरासरी धावसंख्या १७३ धावा असून दुसऱ्या डावात सरासरी धावसंख्या ही १५१ धावा आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यासाठी हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता कमी असून याचा अर्थ चाहते संपूर्ण ४० षटकांमध्ये रोमांचक लढतीचा आनंद घेऊ शकतात.
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, इशान किशन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका संघ: एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, डेवाल्ड ब्रुविस, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, क्वेना म्फाका, लुंगी एनगिडी, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, अँरिच नॉर्टजे, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन.