भारताकडून ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी केला पराभव(फोटो-सोशल मीडिया)
IND w vs AUS W, 3rd T20I : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील तीन सामन्यांची T20I मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना अॅडलेडमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलिया महिला संघाचा १७ धावांनी पराभव केला. या विजयासह, भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियामध्ये मालिका २-१ अशी आपल्या खिशात टाकली. तसेच, या मालिका विजयाने त्यांची दुसरी T20I मालिका जिंकण्यात यश मिळवले. यापूर्वी, भारतीय महिला संघाने २०१५-०१६ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये T20I मालिका जिंकली होती.
अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.भारतीय संघाला पहिला धक्का शेफाली वर्माच्या रूपात बसला, ती १९ धावांवर ७ धावांवर बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी ८२ चेंडूत दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत पोहचवले आणि विजयाचा पाया रचला.
या खेळीदरम्यान स्मृती मानधना यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. ती शतक झळकवेल असे वाटत असताना ती ८२ धावांवर माघारी गेली. ५५ चेंडूंच्या तिच्या खेळीत स्मृती मानधनाने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. जेमिमा रॉड्रिग्ज ४६ चेंडूत ५९ धावांवर पव्हेलियनमध्ये परत गेली. या खेळीत तिने ४ चौकार लगावले. यष्टिरक्षक रिचा घोषने ७ चेंडूत १८ धावांची आक्रमक खेळी करून संघाची धावंसख्या वाढवली.तसेच, कर्णधार हरमनप्रीत कौर २ धावांवर नाबाद राहिली. भारताने ६ बाद १७६ धावा उभ्या केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँडने २ बळी टिपले तर किम गार्थ आणि सोफी मोएलिक्स यांना प्रत्येकी १ बळी घेण्यात यश आले.
प्रत्युत्तरादाखल, भारताने दिलेल्या(भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ )लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात देखील निराशाजनक राहिली. ऑस्ट्रेलियाला १९ धावांवर पहिला झटका बसला. जॉर्जिया वॉल १० धावांवर बाद झाली. बेथ मूनी देखील खास काही करू शकली नाही. ती ६ धावा करून बाद झाली. आपला ३५० वा सामना खेळणरी एलिस पेरी १ धावा करून माघारी गेली. ऑस्ट्रेलिया संघाने ३२ धावांवर आपले महत्वाचे तीन बळी गमावले. त्यानंतर फोबी लिचफिल्ड आणि अॅशले गार्डनर यांनी मिळून डाव सावरला. पण लिचफिल्ड २६ धावांवर बाद झाली. त्यानंतर जॉर्जिया वेअरहॅमने १२ धावा करून माघारी गेली. अॅनाबेल सदरलँडने १४ धावा केल्या. अॅशले गार्डनर एका बाजूने टिकून होती. तिने तिचे अर्धशतक पूर्ण केले. ती ५७ धावा करून बाद झाली. ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकांत ९ बळी गमावून फक्त १५९ धावा करू शकला. परिणामी १७ धावांनी पराभव स्वीकारावा लगाला. भारताकडून श्रेयंका पाटीलने ३, श्री चरणीने ३, अरुंधती रेड्डीने २ आणि रेणुका सिंग ठाकूरने १ विकेट घेतली.






