यश दयाल(फोटो-सोशल मीडिया)
Rape case, Yash Dayal: आयपीएल २०२६ च्या आगामी हंगामाआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अडचणी वाढ झाली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज यश दयालला मोठा कायदेशीर फटका बसला आहे. यश दयालवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असून जयपूरमधील पॉक्सो न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खेळाडूच्या अडचणी वाढल्या आहेत, तसेच आगामी आयपीएल हंगामापूर्वी आरसीबीसाठी देखील हा मोठा धक्का मानला जात आहे.
जयपूर महानगर न्यायालयाच्या (पॉक्सो न्यायालय-३) न्यायाधीश अलका बन्सल यांनी आदेश देत म्हटले आहे की, “रेकॉर्डवरील पुरावे यश दयालला खोट्या गुंतवणुकीत अडकवण्यात आले आहे हे सिद्ध करत नाहीत. या आधारावर न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. खटल्याचे गांभीर्य पाहता, तपासात कोणतीही उदारता दिली जाऊ शकत नसल्याचेही न्यायालयाचे मत आहे.
यश दयाल हा आरसीबीच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असून फ्रँचायझीने त्याला आयपीएल २०२६ साठी ५ कोटी रुपयांना कायम राखले आहे. आयपीएल २०२५ मध्ये त्याने १५ सामन्यांमध्ये १३ बळी घेतले होते, तर २०२४ च्या हंगामात त्याने १४ सामन्यांमध्ये १५ बळी घेण्याची किमया साधली होती.परिणामी, न्यायालयाच्या या निर्णयाचा आरसीबीच्या रणनीती आणि संघ संयोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यश दयालच्या वकिलांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडताना दावा केला की, यश आणि तक्रारदार फक्त सार्वजनिक ठिकाणी भेटले आणि कधीही एकटे दोघे भेटले नाहीत. वकिलाच्या मते, मुलीने प्रौढ असल्याचा दावा करून आर्थिक अडचणींचे कारण देत यशकडून पैसे घेतले. त्यानंतर, तिने अधिक पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. तथापि, न्यायालयाने हे युक्तिवाद अटकपूर्व जामिनासाठी पुरेसे नसल्याचे म्हटले आहे. सर्वांच्या नजरा आता या प्रकरणातील कायदेशीर कारवाईवर असणार आहेत. आयपीएल २०२६ पूर्वी, यश दयालच्या उपलब्धतेबाबत आणि न्यायालयाच्या पुढील निर्णयाबाबत आरसीबी नेमकी काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिकल, फिल साल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा आणि यश दयाल.






