
IND VS SA: Yashasvi Jaiswal's great feat in WTC! He created history in world cricket by making 'this' record
Yashasvi Jaiswal created history at WTC : गुवाहाटी येथे खेळवण्यात ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, यशस्वी जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकवून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला. जुलै २०२३ पासून जयस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारा फलंदाज बनला आहे. यशस्वी जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २० ५०+ धावा फटकावल्या आहेत. दरम्यान, जो रूटने ४६ डाव खेळले असून त्यामध्ये एकूण १७ वेळा कसोटी क्रिकेटमध्ये ५०+ धावा काढल्या आहेत.
हेही वाचा : IND vs SA : एडेन मार्करामच्या जबरदस्त कॅचने नितीश कुमार रेड्डी झाला थक्क; Video Viral
२३ वर्षांच्या वयापर्यंत कसोटीत सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये यशस्वी जयस्वाल पाचव्या क्रमांकावर विराजमा आहे. २३ वर्षांच्या वयापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर अव्वल आहे. सचिन तेंडुलकरने २३ वर्षांच्या वयापर्यंत २९ वेळा ५०+ धावा केल्या होत्या.
या यादीमध्ये रामनरेश सरवन दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत, त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २५ वेळा ५०+ धावा काढण्याची किमया केली आहे. वयाच्या २३ व्या वर्षी. अॅलिस्टर कुकने २३ वेळा, तर जावेद मियांदादने २२ वेळा ही कामगिरी बजावली केली आहे. तर न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने २३ व्या वर्षी २० वेळा ५०+ धावा काढल्या आहेत.