Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: पाकिस्तानला नमवत श्रीलंका फायनलमध्ये; आता भारताविरुद्ध महामुकाबला, कधी अन् कुठे पाहाल सामना?

SL Beat Pak India vs Sri lanka in Women's Asia Cup Final 2026: महिला आशिया कपचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. हा सामना केव्हा आणि कुठे पाहू शकता, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 12, 2026 | 02:00 PM
India vs Sri lanka in Women's Asia Cup Final 2026

India vs Sri lanka in Women's Asia Cup Final 2026

Follow Us
Follow Us:
  • अंतिम सामन्यात भारत-श्रीलंका आमनेसामने
  • सामना कधी आणि कुठे पाहता येणार
  • विजेतेपदासाठी रंगणार महामुकाबला
महिला आशिया कप २०२६ चा दुसरा उपांत्य सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ४ विकेट्सने धुव्वा उडवला. या विजयासह श्रीलंकेने अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. भारताने बांग्लादेशला पराभूत करून आधीच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्यामुळे आता विजेतेपदाच्या भारत आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहेत. हा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.

US Open 2026: सबालेन्काचा पेगुलाला धक्का, रायबाकिनाने गॉफला रडवलं; आता ट्रॉफीसाठी महामुकाबला

श्रीलंकेने पाकिस्तानला चारली धूळ

दुसऱ्या उपांत्य सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १३०/५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेने १८.४ षटकांत ६ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ विकेट्स गमावून १३० धावा केल्या. संघाची सुरुवात फारशी चांगली नव्हती आणि १७ षटकांत पाकिस्तानने ५ विकेट्स गमावून केवळ ९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर कर्णधार फातिमा सनाने शानदार फलंदाजी करत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३६ चेंडूंमध्ये ४७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तिला टुबा हसनने साथ दिली, जी १२ धावांवर नाबाद राहिली. या दोन फलंदाजांनी शेवटच्या २४ चेंडूंमध्ये सहाव्या विकेटसाठी ३८ धावांची अभेद्य भागीदारी केली, ज्यामुळे पाकिस्तान संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. कर्णधार चमारी अथापट्टूने श्रीलंकेकडून २ विकेट्स घेतले.

१३१ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात फातिमा सनाने कर्णधार चमारी अटापट्टू आणि संजना कविंदी यांना सलग दोन चेंडूंवर बाद करून श्रीलंकेला सुरुवातीलाच मोठा धक्का दिला. सहाव्या षटकापर्यंत श्रीलंकेचे चार फलंदाज ३३ धावांवर बाद झाले होते. सुरुवातीच्या या धक्क्यांनंतर हर्षिता समरविक्रमा आणि कविशा दिलहरी यांनी डाव सावरला. हर्षिताने ३६ आणि कविशाने ३३ धावा केल्या आणि या दोघींनी पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, ज्यामुळे श्रीलंकेचा विजय जवळपास निश्चित झाला होता. अखेरीस, फातिमा सनाने त्या दोघींना बाद करून श्रीलंकेची धावसंख्या ६ बाद १०९ वर आणली, पण तोपर्यंत सामना पाकिस्तानच्या हातातून निसटला होता. नीलाक्षी सिल्वा १० चेंडूंमध्ये १८ धावांवर नाबाद राहिली. फातिमा सनाने पाकिस्तानसाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळवला.

आशिया कप फायनलमध्ये भारत- श्रीलंका भिडणार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. महिला आशिया चषक स्पर्धेतील सर्व सामने याच स्टेडियमवर खेळले गेले आहेत. सामना १३ सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल. सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल. हा सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच, सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवरही सामन्याचे थेट प्रक्षेपणकेले जाईल.

कोणाचे पारडे जड?

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी चांगली आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध ३१ सामने खेळले आहेत. भारताने २५ सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभूत केले आहे. भारताला पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही संघांमधील एक सामना रद्द झाला होता. अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताचेच पारडे जड असेल. महिला टी-२० आशिया कपमध्ये दोन्ही संघांमध्ये पाच सामने खेळले गेले आहेत. भारताने चार सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने एक सामना जिंकला आहे. २०२४ मध्ये झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला पराभूत केले होते.

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तानमध्ये T20 थरार; पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; किती वाजता रंगणार मुकाबला?

Web Title: Ind vs sl final womens asia cup 2026 india vs sri lanka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • IND W vs SL W
  • SL vs PAK
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री
1

IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

IND W Vs BAN W: शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक! हरमनप्रीतचा फिनिशिंग टच, बांग्लादेशसमोर मजबूत आव्हान
2

IND W Vs BAN W: शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक! हरमनप्रीतचा फिनिशिंग टच, बांग्लादेशसमोर मजबूत आव्हान

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, केवळ 69 धावा दूर
3

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, केवळ 69 धावा दूर

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?
4

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.