Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

india w beat bangladesh w in Women's asia cup enters final: महिला आशिया कप २०२६ चा उपांत्य फेरीचा सामना बांग्लादेश आणि भारत यांच्यात खेळला गेला. भारताने शानदार कामगिरी करत बांग्लादेशवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 11, 2026 | 01:21 PM
india w beat bangladesh w

india w beat bangladesh w

Follow Us
Follow Us:
  • सेमीफायनलमध्ये भारताचा दबदबा
  • बांग्लादेशला चारली धूळ
  • टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
एसीसी महिला आशिया कप २०२६ ( Womens Asia cup 2026) चा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात खेळला गेला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला. या सामन्यात बांग्लादेश महिला क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. याचा फायदा घेत, भारताने २० षटकांत ६ विकेट्स गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बांग्लादेशने २० षटकांत ७ विकेट्स गमावून केवळ १०९ धावा केल्या. टीम इंडियाने बांगलादेशला ४० धावांनी पराभू त केले. यासह, भारतीय संघाने आशिया कपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

शीतल देवीचा ‘सुवर्ण बाण’! World Archery Para Series मध्ये कझाकस्तानच्या तिरंदाजावर मात; शूट-ऑफमध्ये बाजी मारत पटकावलं गोल्ड

टीम इंडियाने उभारला धावांचा डोंगर

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. फॉर्मात असलेली सलामीवीर स्मृती मंधाना अवघ्या २ धावांवर बाद झाली. यानंतर, तिसऱ्या क्रमांकाची फलंदाज प्रतीका रावल २४ चेंडूंमध्ये केवळ २० धावाच करू शकली. टीम इंडियाची स्टार सलामीवीर शफाली वर्माने शानदार फलंदाजी करत ४० चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या. १६० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना तिने ७ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

कर्णधार हरमनप्रीत कौरने २८ चेंडूंमध्ये केवळ २४ धावा करून तंबूत परतली. विकेटकीपर-फलंदाज रिचा घोषने २१ धावा केल्या. शेवटच्या दोन षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या दीप्ती शर्माने अवघ्या सहा चेंडूंमध्ये १३ धावा करून भारतीय संघाला २० षटकांच्या अखेरीस १४९ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. बांग्लादेशकडून सुलताना खातूनने दोन विकेट्स घेतले.

India Women are into the Asia Cup Final! 🔥🇮🇳 India defeated Bangladesh by 40 runs! They will face either Sri Lanka or Pakistan in the final this coming Sunday! 🏆#WomensAsiaCup pic.twitter.com/OzrYfvq5QJ — 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) September 10, 2026

भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

१५० धावांचे लक्ष्य गाठताना बांग्लादेश महिला क्रिकेट संघाने चांगली सुरुवात केली. मात्र, श्री चरणीने भारतीय संघाला कमबॅक करून दिले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशला सामन्यात आघाडी घेण्यापासून रोखले. बांग्लादेशची सलामीवीर दिलारा अख्तरने २१ धावा केल्या, तर शोभना मोस्तारीने १८ धावांची भर घातली. कर्णधार निगार सुलतानानेही १९ धावा जोडल्या, त्यानंतर शोर्ना अख्तरने नाबाद २२ धावा केल्या. दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेतले, तर नंदिनी शर्मानेही २ विकेट्स घेतले. श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनीही प्रत्येकी १ विकेट्स घेतला.

बांग्लादेश संघ २० षटकांत ७ विकेट्स गमावून केवळ १०९ धावाच करू शकला. यामुळे भारतीय संघाने ४० धावांनी विजय मिळवला. या विजयासह हरमनप्रीत कौरच्या संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

जलवा है भाई का! 13 वर्षांनी ईशान किशनने ईस्ट झोनला जिंकवले; Duleep Trophy 2026 वर कोरले नाव

Web Title: Ind w beat ban w womens asia cup 2026 india reach final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • IND VS BAN
  • IND W vs BAN W
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

IND W Vs BAN W: शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक! हरमनप्रीतचा फिनिशिंग टच, बांग्लादेशसमोर मजबूत आव्हान
1

IND W Vs BAN W: शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक! हरमनप्रीतचा फिनिशिंग टच, बांग्लादेशसमोर मजबूत आव्हान

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, केवळ 69 धावा दूर
2

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, केवळ 69 धावा दूर

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?
3

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?

Asia Cup 2026: रणांगणावर युद्ध पेटणार! Team India समोर कोण असणार? सेमीफायनलमध्ये थेट…
4

Asia Cup 2026: रणांगणावर युद्ध पेटणार! Team India समोर कोण असणार? सेमीफायनलमध्ये थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.