Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल

KL Rahul hugs Devdutt Padikkal after unbelievable DRS rescue: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी, देवदत्त पडिक्कलने केएल राहुलला जीवदान दिले. देवदत्तच्या सल्ल्यानुसार, राहुलने डीआरएस घेतला आणि पंचानी त्याला नाबाद घोषित केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 18, 2026 | 03:21 PM
आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल
Follow Us
Follow Us:
  • राहुलने देवदत्त पडिक्कलचा व्हिडिओ व्हायरल
  • आज सामन्याचा चौथा दिवस
  • जीवनदान भेटूनही राहुल बाद
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिल्या कसोटी सामना गॉल येथे खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी एक अशी घटना घडली, जेव्हा देवदत्त पडिक्कलच्या प्रसंगावधानामुळे केएल राहुलला जीवदान मिळाले. पंचांनी राहुलला पायचीत (LBW) बाद दिले होते आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतणार होता, तेव्हा पडिक्कलने त्याला थांबवले आणि डीआरएस घेण्याचा सल्ला दिला. रिव्ह्यूमध्ये राहुल नाबाद असल्याचे निश्चित झाले आणि त्याने सुटकेचा निःश्वास टाकला. त्यानंतर राहुलने आनंदाने पडिक्कलला मिठी मारली आणि त्याचे आभार मानले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Virat Kohli: ना झुकला, ना थांबला! 18 वर्षे ‘विराट’ राज; ‘चेज मास्टर’ कसा बनला क्रिकेटचा ‘किंग’?

केएल राहुलने देवदत्त पडिक्कलला मिठी मारली

ही घटना भारताच्या दुसऱ्या डावातील ११ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या गोलंदाजी करत होता. केएल राहुलने षटकाच्या पाचव्या चेंडूवर एक शानदार षटकार मारला होता. त्यानंतर राहुलने पुढचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. जयसूर्याच्या चेंडू टर्न होत होता. राहुल पुढे झेपावला, पण चेंडू त्याच्या बॅटला लागून पॅडला लागला. अपील केल्यानंतर पंचांनी तात्काळ बोट वर केले. आपण बाद झाल्याचे राहुलच्याही लक्षात आले आणि तो पॅव्हेलियनच्या दिशेने चालू लागला.

तेव्हा नॉन-स्ट्राइक एंडला उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलने त्याला थांबवले आणि डीआरएस घेण्यास सांगितले. रिव्ह्यूमध्ये दिसले की चेंडू बॅटला लागला नव्हता, पण ट्रॅकिंगमध्ये असेही दिसून आले की चेंडू स्टंप्सवरून जात होता. पंचांना आपला निर्णय बदलावा लागला आणि राहुलला नाबाद घोषित करण्यात आले. पडिक्कलच्या डीआरएस घेण्याच्या निर्णयामुळे राहुलला एक जीवनदान मिळाले. त्यानंतर लगेचच, राहुल पडिक्कलकडे गेला, त्यांना मिठी मारली आणि त्यांच्या समजूतदारपणाबद्दल त्यांचे आभार मानले.

KL Rahul hugging Devdutt Paddikal after a successful DRS suggested by him 😂 #SLvIND pic.twitter.com/vLEys0Vgk3 — Prateek (@prateek_295) August 18, 2026

जीवनदान भेटूनही राहुल बाद

मात्र, राहुलला मिळालेल्या संधीचा फायदा उचलता आला नाही. थोड्याच वेळात तो बाद झाला. डावाच्या १५ व्या षटकात प्रभात जयसूर्याने त्याला बाद केले. राहुल ४७ चेंडूंमध्ये ३५ धावा करून तंबूत परतला. त्याच्या या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. पहिल्या डावात राहुलने १७५ चेंडूंमध्ये ८२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

आज सामन्याचा चौथा दिवस

आज सामन्याचा चौथा दिवस आहे. भारतीय संघावे १९३ धावा केल्या आहेत आणि श्रीलंकेसमोर ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंका हे लक्ष्य गाठेल की भारत हा सामना जिंकेल. हे पाहणे महत्वाचे ठरेल. परंतु हा सामना ड्रॉ झाल्यास भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत नुकसान होऊ शकते.

IND vs PAK: भारत-पाकिस्तान महामुकाबला! टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढाई; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामना?

Web Title: Ind vs sl kl rahul hugs kisses devdutt padikkal after crucial drs call in galle test video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • k l rahul
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs SL: चमत्कार घडणार? श्रीलंका गडबडणार; ३७२ रन्सच्या आत भारत रोखणार? गॉलमध्ये…
1

IND Vs SL: चमत्कार घडणार? श्रीलंका गडबडणार; ३७२ रन्सच्या आत भारत रोखणार? गॉलमध्ये…

IND Vs SL: श्रीलंकेचे जहाज बुडणार? Rishabh Pant चा 100 सिक्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड, पहिला भारतीय अन्…
2

IND Vs SL: श्रीलंकेचे जहाज बुडणार? Rishabh Pant चा 100 सिक्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड, पहिला भारतीय अन्…

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड
3

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड

IND vs SL: मानव सुथार सर्वांवर पडला भारी, कुलदीप-जडेजापेक्षाही ठरला वरचढ; श्रेय दिले सीओईला
4

IND vs SL: मानव सुथार सर्वांवर पडला भारी, कुलदीप-जडेजापेक्षाही ठरला वरचढ; श्रेय दिले सीओईला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.