Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियासमोर नवे संकट! एकाच वेळी ‘हे’ 5 स्टार खेळाडू दुखापतग्रस्त; गिलसमोर मोठी अडचण

Bumrah Hrashit nitish rana Injured Before ind vs sl test: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. एकाच वेळी संघातील ५ महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे कर्णधार गिलची चिंता वाढली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 26, 2026 | 05:03 PM
IND vs SL: श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियासमोर नवे संकट! एकाच वेळी ‘हे’ 5 स्टार खेळाडू दुखापतग्रस्त; गिलसमोर मोठी अडचण
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंका मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का
  • एकाच वेळी 5 खेळाडू दुखापतग्रस्त
  • गिलसमोर मोठी अडचण
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. या मालिकेत पाच स्टार भारतीय खेळाडूंच्या सहभागावर अद्याप अनिश्चितता आहे. या पाचपैकी दोघे खेळाडू आधीच मालिकेतून बाहेर झाले आहेत. मात्र, उर्वरित तिघांचा सहभाग त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. एकाच वेळी इतक्या खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे भारतीय संघाची रचना विस्कळीत होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संघाचा कर्णदार शुभमन गिलसमोर मालिकेआधी एक नवे आव्हान आहे.

IND vs ZIM 3rd T20 Live: टीम इंडियाची क्लीन स्वीपची तयारी! भारताने जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, संघात दोन मोठे बदल

हर्षित राणा आणि नितीश रेड्डी संघाबाहेर

वृत्तानुसार, वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी हे दुखापतीमुळे श्रीलंका दौऱ्यासाठी निवडीकरिता उपलब्ध नाहीत. या दोन्ही युवा खेळाडूंची अनुपस्थिती संघासाठी एक मोठा धक्का मानली जात आहे. हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे कर्णधार शुभमन गिलसमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

बुमराहच्या सहभागावरही सस्पेन्स कायम

बुमराहला मैदानात पाहण्यासाठी आतुर आहेत .परंतु, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सहभागही अनिश्चित मानला जात आहे. बुमराहला ३० जुलैपर्यंत विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यानंतर तो बंगळूरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपला फिटनेस रिपोर्ट सादर करेल. जर त्याचा फिटनेस रिपोर्ट चांगला असेल, तर तो संघात सामील होऊ शकेल. मात्र, जर तो पूर्णपणे तंदुरुस्त नसेल, तर त्यालाही मालिकेतून बाहेर पडावे लागू शकते. जर बुमराह संघाबाहेर गेला तर हा संघासाठी मोटा धक्का असेल.

साई सुदर्शनच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह

कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शनच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बुमराहप्रमाणेच सुदर्शनदेखील दुखापतीतून सावरत आहे. या मालिकेत साई सुदर्शनचा सहभाग अद्याप निश्चित मानला जात नाही. परंतु, निवड समिती या दोन्ही अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश करू शकते.

वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीला मुकणार

वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीला मुकणार असल्याची माहिती आहे.अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. परंतु, २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील एसएससीमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीमध्ये कमबॅक करण्याची होण्याची दाट शक्यता आहे, पण हे पूर्णपणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल.

दुखापतींमुळे तणाव वाढला असला तरी, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन जवळपास निश्चित आहे. फिरकी गोलंदाजी विभागात, मानव सुथारने पदार्पणातच सात विकेट घेतल्यानंतर, हर्ष दुबे आपले स्थान टिकवून ठेवू शकतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.

ICC T20 Ranking: 15 दिवसांत पलटला संपूर्ण खेळ! भारतीय संघ पुन्हा ठरला T20 क्रिकेटचा बादशाह

Web Title: Ind vs sl test series team india injury update bumrah gill harshit rana nitish reddy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Jasprit Bumrah
  • Shubhman Gill
  • Test Match

संबंधित बातम्या

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
1

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.