18 वर्षाच्या अनाहत सिंहने रचला इतिहास! विश्व ज्युनियर स्क्वॉश विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय
आयसीसी टी२० संघ क्रमवारीतील ताज्या अपडेटनुसार, भारतीय संघाने आता २६८ रेटिंग गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंड संघही २६८ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, परंतु हा अंतर मोठा नाही. त्यामुळे, झिम्बाब्वेविरुद्धचा मालिकेतील अंतिम सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरेल, ज्यातील विजयामुळे त्यांच्या रेटिंग गुणांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. टी२० संघ क्रमवारीत इतर कोणत्याही संघाच्या स्थानात बदल झालेला नाही, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. दरम्यान, पाकिस्तान २४० रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने अवघ्या ४४ चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ८१ धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या खराब कामगिरीमुळे टीकेचा सामना करणाऱ्या उपकर्णधार तिलक वर्मानेही ६० धावांची शानदार खेळी केली. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज रविवारी हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळला जाईल. दुसर्या सामन्यात प्रिन्स यादवला दुखापत झाली त्यामुळे आजच्या सामन्यात संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, मयंक यादव, प्रिन्स यादव, यश ठाकूर.






