
IND vs WI 3rd T20I Indore Weather Report
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यासाठी तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पावसाची अजिबात शक्यता नाही. इंदौरमधील हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरणाची शक्यता कमी आहे. तसेच,संध्याकाळी मैदानावर दव पडण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होईल.
इंदौरच्या होळकर स्टेडियमवर आतापर्यंत एकूण चार टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी दोन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. या मैदानावर सरासरी धावगती प्रति षटक ९.८५ धावा आहे. ही खेळपट्टी फलंदाजांना फलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. रांची टी२० सामन्यात एकूण ५०१ धावा झाल्या होत्या आणि तिसऱ्या सामन्यातही तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. या खेळपट्टीवर संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत मोठे लक्ष्य ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतो. दोन्ही संघांकडे आक्रमक फलंदाज असल्याने या सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.
इंदौरच्या होळकर स्टेडियमवर पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २०१७ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने ८८ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. तीन वर्षांनंतर, भारत आणि श्रीलंका पुन्हा होळकर स्टेडियमवर आमनेसामने आले. जानेवारी २०२० मध्ये झालेल्या या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. यानंतर, ऑक्टोबर २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला ४९ धावांनी पराभूत केले. या मैदानावर शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना जानेवारी २०२४ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. भारताने हा सामना ६ विकेट्सने जिंकला.