फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिनी वेस्टइंडीज च्या संघाने दमदार कमबॅक केला आहे. यामध्ये वेस्टइंडीजचा फलंदाज जॉन कॅम्पबेल याने शतकीय खेळी खेळली आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय करियर मध्ये पहिले शतक झळकावले. कॅम्पबेलचे शतक तेव्हा आले जेव्हा वेस्ट इंडिज संकटात होते. भारताच्या संघाने झालेल्या पहिल्या सेशनमध्ये फक्त 1 विकेट घेतला.
वेस्ट इंडिजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेलने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक होते. भारताच्या ५१८ धावांच्या तुलनेत त्यांचा पहिला डाव २४८ धावांवर संपला, ज्यामुळे पाहुण्या संघाला फॉलोऑन करावा लागला. अशा कठीण परिस्थितीत त्याच्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावणे कौतुकास्पद आहे. तथापि, या शतकामुळे कॅम्पबेलचे नाव लज्जास्पद कामगिरीच्या यादीत जोडले गेले आहे.
Promise made, promise kept! 🏏👏🏿 Our first test centurion of the year, in the most testing of conditions. #INDvWI | #MenInMaroon pic.twitter.com/4Qy06NoQUF — Windies Cricket (@windiescricket) October 13, 2025
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीराने पहिले शतक ठोकण्यासाठी घेतलेल्या सर्वाधिक डावांचा हा विक्रम आहे. जॉन कॅम्पबेलचे शतक त्याच्या ४८ व्या कसोटी डावात आले. कॅम्पबेल जागतिक विक्रमापासून फार दूर नाही. दक्षिण आफ्रिकेच्या ट्रेवर गोडार्डने त्याच्या ५८ व्या डावात पहिले कसोटी शतक ठोकले.
जॉन कॅम्पबेलने इतरही अनेक विक्रम केले. २०२३ नंतर शतक झळकावणारा तो वेस्ट इंडिजचा पहिला सलामीवीर ठरला. २००६ नंतर भारताविरुद्ध शतक झळकावणारा तो पहिला सलामीवीरही आहे. त्यापूर्वी डॅरेन गंगाने बासेटेरेमध्ये १३५ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजच्या सलामीवीराने भारतात शतक ठोकल्याला २३ वर्षे झाली आहेत. कॅम्पबेलच्या आधी, वेव्हेल हिंड्सने २००२ मध्ये ईडन गार्डन्सवर ही कामगिरी केली होती.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजची प्रभावी फलंदाजी सुरूच राहिली. फॉलो-ऑननंतर पाहुण्या संघाने २०० धावा केल्या. कॅम्पबेलला शाई होपची साथ मिळत आहे. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १७० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. त्यांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी हताश केले आहे.