Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026: सेमीफायनलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कसा ठरणार? ICC चे नियम काय सांगतात?

मैदानातील लढतीसोबतच चाहत्यांच्या मनात एका गोष्टीची धास्ती आहे, ती म्हणजे 'पाऊस'. जर पाऊसच मैदानात खेळायला उतरला तर अंतिम फेरीचा निकाल कसा लागणार? याचे संपूर्ण गणित ICCने त्यांच्या नियमावलीत सांगितली आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 02, 2026 | 07:50 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर…
  • ICC चे नियम काय सांगतात?
  • राखीव दिवसाची तरतूद? पण नियम काय?
T20 World Cup 2026: 2026 च्या T20 वर्ल्डकपचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आता क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेत भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड या चार बलाढ्य संघांनी Semi-finals मध्ये धडक मारली आहे. मात्र, मैदानातील लढतीसोबतच चाहत्यांच्या मनात एका गोष्टीची धास्ती आहे, ती म्हणजे ‘पाऊस’. जर पाऊसच मैदानात खेळायला उतरला तर अंतिम फेरीचा निकाल कसा लागणार? याचे संपूर्ण गणित ICCने त्यांच्या नियमावलीत सांगितली आहेत.

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनचा चौकार आणि षटकार पाऊस; मोडला ‘मुंबईच्या राजा’चा विक्रम

Semi-finalsचं वेळापत्रक

यावेळच्या वर्ल्डकपमध्ये  दोन ऐतिहासिक स्टेडियमवर हे हाय-व्होल्टेज सामने होणार आहेत. पहिली सेमीफायनल ही 4 मार्च 2026 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. तर दुसरी सेमीफायनल ही 5 मार्च 2026 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान भारत आणि इंग्लंड एकमेकांसमोर उभे  ठाकणार आहेत.

पाऊस पडला तर काय?

निसर्ग कोणाच्याही कंट्रोलमध्ये नसतो. त्यामुळे ICC ने Knockout Stage सामन्यांसाठी विशेष तरतूद केली आहे. 5 मार्च रोजी मुंबईत भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि खेळ थांबवावा लागला, तर सर्वात आधी ‘रिझर्व्ह डे’ म्हणजेच राखीव दिवसाचा नियम लागू होईल.

उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी ICC ने प्रत्येकी एक अतिरिक्त दिवस राखून ठेवला आहे. जर 5 मार्च रोजी सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर तो 6 मार्च रोजी जिथे थांबला होता तिथूनच पुन्हा सुरू केला जाईल. प्रेक्षकांसाठी ही दिलासादायक बाब असली, तरी खरी अडचण तेव्हा येते जेव्हा राखीव दिवशीही पाऊस थांबत नसेल तर काय होणार?

राखीव दिवसही पावसात धुऊन गेला तर?

जर दुर्दैवाने राखीव दिवशीही पाऊस पडला आणि एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला, तर चेंडू आणि बॅटचा खेळ बाजूला राहून आकड्यांचा खेळ सुरू होतो. ICC च्या नियमानुसार, अशा परिस्थितीत ज्या संघाने ‘सुपर ८’ (Super 8) फेरीत आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले आहे. असा  संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो.

या नियमानुसार जर दोन्ही उपांत्य सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत. तर आपल्या गटात अव्वल स्थानी असलेले दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करतील. भारतीय चाहत्यांसाठी ही चिंतेची बाब असू शकते. कारण गुणतालिकेतील स्थान अशा वेळी निर्णायक ठरते.

निकाल लागण्यासाठी किती ओव्हर्स खेळणे गरजेचे?

Semi-finals सामन्यांमध्ये निकालासाठी5-5 ओव्हर्सचा खेळ होणे पुरेसं असतं. मात्र, ICC च्या नवीन नियमांनुसार, वर्ल्डकपच्या उपांत्य आणि अंतिम सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही डावांत किमान 10-10 ओव्हर्स खेळल्या जाणे अनिवार्य आहे. जर 10 ओव्हर्सचा खेळ झाला नाही, तरच तो सामना अनिर्णित मानून राखीव दिवसाचा किंवा गुणतालिकेचा आधार घेतला जातो. एकूणच, मैदानावरील खेळाडूंप्रमाणेच आता चाहत्यांच्या नजरा आकाशाकडेही लागल्या आहेत. 5 मार्चला वानखेडेवर पावसाने विश्रांती घेतली, तरच क्रिकेटप्रेमींना भारत आणि इंग्लंडमधील अटीतटीची लढत पाहायला मिळेल.

Sanju Samson :- संजू सॅमसन आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं

Web Title: Who will be declared winner semi final washed out in rain t20 world cup semi final rain rules reserve day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • cricket
  • ICC
  • ICC Ranking
  • IND Vs ENG
  • SA vs NZ
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
1

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण
2

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल
3

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
4

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.