Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND w vs AUS W, T-20 Series : एलिस पेरीने इतिहास घडवला! ऑस्ट्रेलियासाठी ‘हा’ भीम पराक्रम करणारी ठरली पहिली महिला खेळाडू

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू एलीस पेरीने ऑस्ट्रेलियन संघासाठी ३५० सामने इतिहास घडवला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 21, 2026 | 04:27 PM
IND w vs AUS W, T-20 Series: Ellyse Perry creates history! She becomes the first woman player to achieve 'Ha' Bheem feat for Australia

IND w vs AUS W, T-20 Series: Ellyse Perry creates history! She becomes the first woman player to achieve 'Ha' Bheem feat for Australia

Follow Us
Close
Follow Us:

Ellyse Perry creates history against India : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून जिथे टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळल्या जाणार आहेत. टी-२० मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत आहे. दरम्यान, भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाची अनुभवी एलिस पेरीने इतिहास रचला आहे.

हेही वाचा : IND VS ZIM : ‘आमच्यावर नाही, भारतावरच दबाव…’ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेला धूळ चारणाऱ्या झिम्बाब्वेने सूर्याआर्मीविरुद्ध फोडली डरकाळी

एलिस पेरीचा हा ३५० वा सामना ठरला. ती ऑस्ट्रेलियन महिला संघासाठी ३५० सामने खेळणारी पहिलीच खेळाडू बनली आहे. ही कामगिरी करणारी ती जगातील तिसरी महिला क्रिकेटपटू देखील ठरली आहे. पेरीपूर्वी फक्त दोन खेळाडूंनी ही कामगिरी बजावली आहे.  भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स यांनी ही कामगिरी केली आहे.

 २००७ मध्ये पेरीचे पदार्पण

२००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या एलिस पेरीने आजपर्यंत ३५० सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. एका वृत्तानुसार, पेरी म्हणाली की, “माझ्या मनात कोणतेही विशिष्ट टप्पे नाहीत. मला फक्त हा संघ काय करत आहे ते अनुभवायचे आहे आणि जोपर्यंत मी योगदान देऊन त्यात समाधान मिळवत आहे तोपर्यंत मला येथेच राहायला आवडेल. पुढे नेहमीच रोमांचक गोष्टी असतात, पण ते कुठे जाते ते आपण पाहणार आहोत.”

पेरीचा विक्रम कोण मोडणार?

एलिस पेरीनंतर, सध्याची एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार एलिसा हीलीने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक सामने खेळलेले आहेत. हीलीने एकूण २९५ सामने खेळलेले आहेत. हीलीने पुढील महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या डे-नाईट कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा : IND VS PAK : पुन्हा रंगणार हायहोल्टेज ड्रामा! T20 World Cup मध्ये उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात भारत-पाक येणार आमनेसामने?

एलिस पेरीची क्रिकेट कारकीर्द

एलिस पेरी ही ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असून  तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी पेरीच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, तिने १४ कसोटी सामन्यांमध्ये ९३० धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये तिने दोन शतके आणि चार अर्धशतक लगावले आहेत.  नाबाद २१३ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. तिने ३९ बळी देखील टिपले आहेत. तिने १६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३७ डाव खेळले आहेत, ४,५०४ धावा केल्या आहेत आणि १६६ बळी घेतले असून ज्यात तीन शतके आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. तिच्या १७० टी-२० सामन्यांमध्ये २,२०० धावा आणि १२६ बळी आहेत, यामध्ये तिने ९ अर्धशतके ठोकली आहेत.

Web Title: Ind w vs aus w ellyse perry becomes the first woman player to play 350 matches for australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • IND w vs AUS W
  • T-20 Series

संबंधित बातम्या

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11
1

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

IND W vs AUS W : मालिकेत बरोबरी…तिसऱ्या सामन्यावर असेल भारतीय संघाची नजर! कोणाच्या हाती लागणार सिरीज
2

IND W vs AUS W : मालिकेत बरोबरी…तिसऱ्या सामन्यावर असेल भारतीय संघाची नजर! कोणाच्या हाती लागणार सिरीज

IND w vs AUS W, T-20 Series : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 19 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत 
3

IND w vs AUS W, T-20 Series : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 19 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत 

INDW vs AUS W, T-20 Series : अजिंक्य आघाडी मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य! ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज दूसरा टी-२० सामना रंगणार
4

INDW vs AUS W, T-20 Series : अजिंक्य आघाडी मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य! ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज दूसरा टी-२० सामना रंगणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.