भारत वि पाकिस्तान(फोटो-सोशल मीडिया)
India and Pakistan will face each other in the T20 World Cup 2026 : टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये २१ फेब्रुवारीपासून सुपर८ चे सामने सुरू होणार आहेत. आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाहिला सुपर ८ मधील सामना रंगणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्याबाबत सांगायचे झाले तर भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने त्यांच्यातील सामना १५ फेब्रुवारीला खेळला गेला. या सामना भारताने ६१ धावांनी आपल्या नावे केला होता. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ अ गटातून सुपर८ मध्ये दाखल झाले आहेत. सुपर ८ मध्ये दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात असल्यामुळे दोन्ही संघांमध्ये सुपर ८ मध्ये सामना होणार नसला तरी उपांत्य फेरीत किंवा अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमने सामने येण्याची शक्यता आहे. भारताने साखळी स्पर्धेतील सामना एकतर्फी जिंकला होता. आता भारत आणि पाकिस्तान पुन्हा टी२० वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येण्याची शक्यता आहे. ते कसे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
टी२० वर्ल्ड कपमधील सुपर८ मध्ये भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात आहेत. ज्यामुळे सुपर ८ मध्ये ते आमने-सामने येणार नाहीत. सुपर८ मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे एकाच गटात आहेत. तर दुसऱ्या गटात श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान आहेत.
उपांत्य फेरी: भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होऊ शकतो. भारत एक्स गटात पहिल्या स्थानी राहिला आणि पाकिस्तान वाय गटात दुसऱ्या स्थानी राहिल्यास उपांत्य फेरीचा सामना या संघांत होऊ शकतो. याशिवाय पाकिस्तान वाय गटात पहिल्या स्थान आणि भारत एक्स गटात दुसऱ्या स्थानी राहिल्यास उपांत्य फेरीची लढत दोन्ही संघात होऊ शकते. अंतिम सामना जर भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीच्या लढतीत आमने सामने आले नाहीत तर अंतिम सामन्यात देखील आमने सामने येऊ शकतात. जर भारत एक्स गटात पहिल्या स्थानी राहिला आणि पाकिस्तान वाय गटात पहिल्या स्थानी राहिला तर या दोन्ही संघ उपांत्य फेरीत आमने सामने येणार नाहीत. मात्र, भारत आणि पाकिस्तानने अंतिम सामन्यात प्रवेश केल्यास ते आमने सामने येऊ शकतात.






