Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W: सेमीफायनलसाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान; लॉर्ड्सवर आज रंगणार महामुकाबला, कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?

IND W vs AUS WWorld Cup Match Playing 11: महिला टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आज लॉर्ड्सवर आमनेसामने येतील. हा सामना भारताचा उपांत्य फेरीतील मार्ग निश्चित करेल, तर ऑस्ट्रेलिया आधीच अंतिम चारमध्ये पोहोचण्याच्या जवळ आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 28, 2026 | 01:11 PM
IND W vs AUS W: सेमीफायनलसाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान; लॉर्ड्सवर आज रंगणार महामुकाबला, कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?
Follow Us
Follow Us:
  • भारताची आज खरी कसोटी
  • लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाशी महासंग्राम
  • कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?
महिला टी२० विश्वचषक २०२६ ( ICC Women’s T20 World Cup 2026) स्पर्धेत आज (२८ जून) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. गट अ मधील हा सामना लंडन येथील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सामन्याला सुकरुवात होईल. हा सामना भारतीय संघासाठी ‘करो या मरो’ असा आहे. जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले, तर त्यांचे सेमिफायनलमधील स्थान जवळपास निश्चित होईल. पराभव झाल्यास, भारताला दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. या महत्वाच्या सामन्यात कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

भारतासाठी मोठी बातमी! नीरज चोप्रा Asian Games 2026 मध्ये खेळणार; AFI ने दिली माहिती

भारताची सेमिफायनच्या दिशेने वाटचाल

पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर, संघाने बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करत एक शानदार विजय मिळवला. चार सामन्यांत तीन विजयांसह भारताचे सहा गुण झाले असून, त्यांचा नेट रन रेट +२.२६८ आहे, ज्यामुळे पात्रतेच्या शर्यतीत संघ मजबूत स्थितीत आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने आपले चारही सामने जिंकून सेमिफायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. सहा वेळा चॅम्पियन ठरलेल्या या संघाचा नेट रन रेट +४.७२४ आहे.

भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचे मोठे आव्हान

ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांच्या संघातील खेळाडू. हा संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून राहिलेला नाही. अनुभवी अष्टपैलू एलिस पेरी १२७ धावांसह संघाची सर्वात यशस्वी फलंदाज आहे, तर कर्णधार सोफी मोलिन्यू सहा विकेटसह गोलंदाजीचे नेतृत्व करत आहे. भारताचे यश प्रामुख्याने स्मृती मंधाना आणि डावखुरी फिरकी गोलंदाज एन. श्री चरणी यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. मंधानाने चार सामन्यांमध्ये १६७ धावा केल्या आहेत, तर चरणी १२ विकेटसह स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली आहे.

इतिहास भारताच्या विरोधात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने २७ सामने जिंकले आहेत, तर भारताने केवळ ९ सामने जिंकले आहेत. तर एक सामना ड्रॉ राहिला आहे.

दोन्ही संघांसाठी संभाव्य प्लेइंग 11

भारत: शफाली वर्मा, स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी/नंदिनी शर्मा, रेणुका सिंग, श्री चरणी.

ऑस्ट्रेलिया: बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वॉल, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिन्यू (कर्णधार), अलाना किंग, किम गार्थ.

FIFA World Cup 2026: उस्मान डेम्बेलेच्या तडाख्यात नॉर्वे गारद; पहिल्याच हाफमध्ये हॅट्ट्रिक, फ्रान्सचा ४-१ ने दणदणीत विजय

Web Title: Ind w vs aus w india vs australia women playing 11 t20 world cup 2026 lords match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup
  • IND VS AUS
  • Indian Women Cricket Team

संबंधित बातम्या

IND vs AUS: भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाची कसोटी! टीम इंडिया-कांगारूंची टक्कर; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला? नोट करा शेड्यूल
1

IND vs AUS: भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाची कसोटी! टीम इंडिया-कांगारूंची टक्कर; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला? नोट करा शेड्यूल

AUS Vs BAN: नुसता लाज घालवायचा धंदा! बांग्लादेश 54 रन्समध्ये ऑल आउट; कांगारूंनी काढली हवा
2

AUS Vs BAN: नुसता लाज घालवायचा धंदा! बांग्लादेश 54 रन्समध्ये ऑल आउट; कांगारूंनी काढली हवा

Women’s Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?
3

Women’s Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.