IND W vs NZ W: India and New Zealand face off in a do-or-die match; When, where and how to watch the match? Read in detail
ICC ODI World Cup 2025 : महिला विश्वचषक 2025 मध्ये 23 ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघासाठी ‘करा किंवा मरा’ असणार आहे. दोन्ही संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी त्यांचे उपांत्य फेरीचे स्थान निश्चित केले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथ्या स्थानासाठी जोरदार लढत बघायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल आणि स्पर्धेत आपला दावा अधिक मजबूत करेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात येणारा हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:00 वाजता सुरू होणार असून नाणेफेक दुपारी 2:30 वाजता होईल. सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. चाहते जिओ टीव्ही आणि वेबसाइटवर थेट स्ट्रीमिंगद्वारे देखील सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ यांच्यात आतापर्यंत एकूण ५७ सामने खेळवण्यात आले आहेत. या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने ३४ सामन्यात बाजी मारली आहे तर भारतीय संघाने २२ सामने जिंकले आहेत. यामधील एक सामना बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांमधील सामने नेहमीच अटीतटी चे राहिले आहेत आणि यावेळी देखील चाहत्यांना उच्च दर्जाच्या क्रिकेटची मेजवानी मिळेल असे बोलले जात आहे. मागील रेकॉर्ड आणि दोन्ही संघांचे फॉर्म पाहता, भारतीय संघ त्यांच्या घरच्या परिस्थितीचा फायदा उठवून जिंकण्याचा प्रयत्नात असेल तर न्यूझीलंड त्यांच्या मजबूत रणनीतीने सामन्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल, असे दिसते.
हेही वाचा : भारतीय संघात धर्म महत्वाचा? सरफराज खानचे नाव घेत मुस्लिम नेत्यांचा प्रशिक्षक गंभीरवर हल्लाबोल
भारत आणि न्यूझीलंड यांचे संभाव्य संघ
न्यूझीलंड महिला संघ संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, इसाबेला गेज (यष्टीरक्षक), जेस केर, रोझमेरी मायर, ब्री एलिंग, एडन कार्सन, ली ताहुहू, हन्ना रो, पॉली इंग्लिस आणि बेला जेम्स.
भारतीय महिला संघ: प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, अरविंद रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि युवती.