सरफराज खान(फोटो-सोशल मीडिया)
Sarfaraz Khan not selected in India ‘A’ team : बीसीसीआयकडून अलीकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सरफराज खानला भारतीय ‘अ’ संघात स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. मागील पाच वर्षांत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११०.४७ च्या प्रभावी सरासरीने १० शतके आणि ५ अर्धशतके ठोकणाऱ्या सरफराजकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. आता यावर भारतातील दोन मुस्लिम नेत्यांनी देखील भाष्य केले आणि आपली नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : हार्दिक पंड्याला लॉटरी? ‘या’ मालिकेसाठी भारतीय संघात करणार ‘रॉयल’ पुनरागमन
या दोन मुस्लिम नेत्यांमध्ये आम्ही ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांचा समावेश आहे. या दोघांनी देखील सरफराजकडे वारंवार दुर्लक्ष केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. या निर्णयानंतर चाहत्यांनी देखील आपली निराशा व्यक्त केली आहे. या दोन मूलसिम नेत्यांचे म्हणणे आहे की, सरफराज खान मुस्लिम असल्याने त्याला भारतीय संघात स्थान देण्यात येत नाही.
काँग्रेस नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर आरोप करत म्हटले आहे की, सरफराज खानची निवड न होणे हे त्याच्या धर्म आणि आडनावाशी जोडले गेले होते, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. डॉ. शमा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना यांनी लिहिले की, “सरफराज खानची निवड त्याच्या आडनावामुळे संघात झाली नाही का? गौतम गंभीरचे याबद्दल काय मत आहे हे आम्हाला आमहित आहे.” डॉ. शमा मोहम्मद यांच्या पोस्टने एकच खळबळ उडाली आहे. या पोस्टने आता मुद्दा केवळ क्रीडा वादापासून राजकीय वादामध्ये रूपांतरित झाला आहे.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील सरफराज खानला भारतीय अ संघात स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण केले आहेत. ते म्हणाले की, “सरफराज खानची भारतीय अ संघात निवड का झाली नाही?”
सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्या शानदार कामगिरीने प्रभावित केले आहे. त्याने ५६ सामन्यांमध्ये ६५.१९ च्या सरासरीने ४७५९ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये त्याने १६ शतके आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने भारतीय संघासाठी सहा कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ३७.१० च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत.