Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SA W : Women’s ODI World Cup च्या अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था; नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे जारी

आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना रविवारी नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. या सामान्यासाठी व्यापक सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाची तयारी केली गेली आहे,

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 02, 2025 | 04:23 PM
IND W vs SA W: Tight security arrangements for Women's ODI World Cup final; Traffic guidelines issued in Navi Mumbai

IND W vs SA W: Tight security arrangements for Women's ODI World Cup final; Traffic guidelines issued in Navi Mumbai

Follow Us
Close
Follow Us:
  • आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्याला पावसामुळे विलंब 
  • नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली 
  • नवी मुंबई पोलिसांकडून व्यापक सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाची तयारी 

Traffic guidelines issued in Navi Mumbai : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना रविवारी नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना खेळवण्याच्या वेळात मैदानावर पावसाची फटके बाजी सुरू आहे. त्यामुळे आता सांमन्याला विलंब होत आहे. या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी व्यापक सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाची तयारी केली आहे. सामना सुरळीत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने मोठा फौजफाटा देखील तैनात केला आहे.

स्टेडियम आणि परिसरात सुमारे १,००० सुरक्षा कर्मचारी तैनात केले गेले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये एक पोलिस उपायुक्त, तीन सहाय्यक आयुक्त, ९० हून अधिक अधिकारी आणि ४५० हून अधिक कॉन्स्टेबल यांचा समावेश असून वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी आणि वॉर्डन देखील तैनात करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा : IND vs AUS 3rd T20 : होबार्टमध्ये टिम डेव्हिड-स्टोइनिसचे वादळ! ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य!

प्रेक्षकांच्या मोठ्या गर्दीमुळे आणि हजारो वाहनांच्या हालचालीमुळे होणारी वाहतूक कोंडी हाताळण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. परिणामी, स्टेडियमभोवतीच्या अनेक रस्त्यांवर वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे.

बेस्ट आणि एनएमएमटी बसेस वापरण्याचे करण्यात आले आवाहन

नवी मुंबई पोलिसांकडून विशेषतः प्रेक्षकांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बेस्ट आणि एनएमएमटी बसेससारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची विनंती करण्यात आली आहे. नागरिकांनाही लवकर प्रवास सुरू करण्याचे आवाहन केले गेले आहे. अनधिकृत पार्किंगवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा : PAK vs SA : आता ‘किंग’ कोहलीला विसरा! बाबर आझम राहील लक्षात, टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास विक्रम

तात्पुरती पार्किंग सुविधा उपलब्ध

अंतिम सामना बघण्यासाठी येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक ठिकाणी तात्पुरती पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.  या पर्यायी पार्किंग ठिकाणी टांगाईल मैदान, भीमाशंकर मैदान, एनएमएमसी स्टॅक पार्किंग, यशवंतराव चव्हाण मैदान, रामलीला मैदान, आचार्य श्री तुलसी उद्यान आणि बेलापूरमधील सुनील गावस्कर मैदान यांचा समावेश आहे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासासाठी पोलिस पूर्णपणे सज्ज झाले आहेत. अवैध पार्किंगवर त्वरित कारवाई करण्यासाठी घटनास्थळी चार टोइंग व्हॅन, दोन दुचाकी टोइंग व्हॅन आणि एक हायड्रा क्रेन देखील तैनात करण्यात आली आहे. सामन्यादरम्यान कोणती देखील गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांकडून नागरिकांना सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Ind w vs sa w traffic guidelines issued for womens odi world cup final in navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • ICC Women Cricket World Cup 2025
  • Ind Vs Sa
  • IND W vs SA W
  • Road Traffic

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: फ्रीमध्ये पाहा IND W vs SA W फायनल! जियो यूजर्ससाठी हा आहे बेस्ट रिचार्ज प्लॅन
1

Jio Recharge Plan: फ्रीमध्ये पाहा IND W vs SA W फायनल! जियो यूजर्ससाठी हा आहे बेस्ट रिचार्ज प्लॅन

IND W vs SA W Final Match Live :गंभीर आणि सूर्याकडून भारतीय महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव; दिला खास मंत्र; पाहा Video
2

IND W vs SA W Final Match Live :गंभीर आणि सूर्याकडून भारतीय महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव; दिला खास मंत्र; पाहा Video

IND W vs SA W Final : अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने केली विजयासाठी गर्जना, म्हणाली, “आम्हाला पराभवाचे दुःख माहित आहे पण…”
3

IND W vs SA W Final : अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने केली विजयासाठी गर्जना, म्हणाली, “आम्हाला पराभवाचे दुःख माहित आहे पण…”

Women’s World Cup Final : नजर टाका भारतीय महिला संघाच्या या खास  महिला चढउताराच्या प्रवासावर, सेमीफायनलमध्ये चारली कांगारुला धूळ
4

Women’s World Cup Final : नजर टाका भारतीय महिला संघाच्या या खास महिला चढउताराच्या प्रवासावर, सेमीफायनलमध्ये चारली कांगारुला धूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.