ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
India vs Australia 3rd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे खेळला जात आहे. नाणेफेक गामणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने टिम डेव्हिड आणि मार्कस स्टोइनिसच्या अर्धशतकांच्या जोरावर ६ गडी गमावून १८६ धावा केल्या आहेत. भारताला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी १८७ धावा कराव्या लागणार आहे. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा : PAK vs SA : आता ‘किंग’ कोहलीला विसरा! बाबर आझम राहील लक्षात, टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास विक्रम
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर ऑस्ट्रेलिया संघाला फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी डावाची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली नाही. ट्रॅव्हिस हेडच्या रूपात ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. त्याला अर्शदीप सिंगने 6 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर मैदानात आलेल्या जोश इंग्लिसला देखील १ धावांवर अर्शदीपने आपली शिकार बनवले. त्यानंतर मैदानात आले टीम डेव्हिड नावाचे वादळ. त्याने भारतीय गोलंदाजीवर चांगलाच हल्ला चढवला. त्याने चौफेर फटके मारले. या दरम्यान कर्णधार मिचेल मार्श ११ धावा करून बाद झाला. त्याला वरुण चक्रवर्तीने आपल्या जाळ्यात ओढले.
त्याच्या पुढच्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने मिचेल ओवेन भोपळाही फोडू दिला नाही आणि त्याला ० वर क्लीन बोल्ड केले. ओवेन नंतर मैदानात आला मार्कस स्टोइनिस. त्याने आणि टिम डेव्हिडने चांगली भागीदारी केली. टिम डेव्हिडने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ३८ चेंडूत ७४ धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ५ षटकार लागवले. त्याला शिवम दुबेने बाद केले. त्यानंतर स्टोइनिसने मोर्चा सांभाळला त्याने ३९ चेंडूत ६४ धावा केल्या. त्याला अर्शदीप सिंगने बाद केले. त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट २६ धावांवर तर झेवियर बार्टलेट ३ धावांवरनाबाद राहिले. भारताकडून अर्शदीप सिंगने ४ ओव्हरमध्ये ३५ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्तीने २ आणि शिवम दुबेने १ विकेट्स काढली.
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू शॉर्ट, शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुह्नेमन.
बातमी अपडेट होत आहे…






