भारताचा नेपाळवर दणदणीत विजय (फोटो -ट्विटर)
भारतीय संघाने नेपाळला 333 रन्सचे टार्गेट दिले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी नेपाळचा संघ मैदानात उतरला. मात्र सुरुवातीपासूनच नेपाळची फलंदाजी ढेपाळली. नेपाळचे दोन्ही सलामीवीर शून्यावर आउट झाले. त्यामुळे नेपाळ मोठ्या अडचणीत सापडला. त्यानंतर आलेल्या दीपक डुमरे देखील केवळ 1 रन्स करून आउट झाला. बासीर अहमद शून्यावर आउट झाला. नेपाळने 17 रन्सवर 7 विकेट्स गमावल्या. नेपाळकडून खेळताना पवन सराफने 6 रन्स केल्या. तर राशिद खान देखील 6 रन्स करून आउट झाला. लोकेश बाम शून्यावर आउट झाला.
IND Vs NEP : भारताचे नेपाळला 333 धावांचे आव्हान, तिलक-कुशाग्रचे दणदणीत शतक
333 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या नेपाळच्या संघाला रोखण्यासाठी भारताचे गोलंदाज सज्ज झाले होते. सुरुवातीपासूनच भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत नेपाळची दयनीय अवस्था केली. प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी नेपाळची वाट लावली.
Terrific start with the ball 👌 Harshit Rana 🤝 Prince Yadav 4️⃣ wickets in no time for India A Updates ▶️ https://t.co/r7KnQLPzIm #TeamIndia | #INDAvNEP | #RisingStarsAsiaCup https://t.co/xElAbC0CPb — BCCI (@BCCI) November 20, 2026
नेपाळविरुद्ध सलामीला आलेली जोडी वैभव सूर्यवंशी व अभिषेक शर्मा यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र नेपाळच्या गोलंदाजांचा ते सामना करू शकले नाहीत. वैभवने 3 चौकार व 1 षटकारच्या मदतीने 26 धावा केल्या असल्या तरी तो जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. पवन सराफने चक्क त्याला क्लीनबोल्ड केले. तर अभिषेक हा नंदन यादवचा शिकार ठरला. तसेच तिसऱ्या क्रमांकावर आलेला आयुष बदोनी फक्त 2 धावाच करू शकला. अशाप्रकारे दहाव्याच षटकात भारताची अवस्था 3 बाद 42 धावा अशी झाली. भारताचा हा ‘ए’ संघ असला तरी संघात दमदार खेळाडूंचा भरणा आहे. असे असतानाही नेपाळच्या गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली. त्यांच्याकडून संदीप लामिचिने व ललित राजबंसी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
Ans: भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर नेपाळसमोर 333 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
Ans: 333 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. नेपाळने अवघ्या 17 धावांत 7 विकेट्स गमावल्या.






