India sacked 25 Pakistani players! 'This' big stadium took a drastic decision...
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हळहळू निवळत असल्याचे चित्र आहे. पहालगाम हल्ल्यांतर या दोन देशातील तणाव वाढला होता. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून २६ भारतीय पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले होते.
या दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण शिगेला पोहोचले होते. त्याचा थेट परिणाम क्रिकेट या खेळावर देखील दिसून आला. या काळात, दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्या, राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
हेही वाचा : LSG vs SRH : लखनऊच्या प्लेऑफच्या आशा झाल्या नष्ट! SRH ने LSG ला 6 विकेट्सने केले पराभूत
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविरुद्ध आगपाखड केली होती. त्यामुळे आता जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमने एक मोठे पाऊल उचलले आहे. सवाई मानसिंग स्टेडियममधील ‘वॉल ऑफ ग्लोरी’ वरून सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. येथे खेळलेल्या परदेशी खेळाडूंचे फोटो या स्टेडियममध्ये लावण्यात आले होते. त्यातील २५ पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो आता काढण्याचा निर्णय घेण्यात आलो आहे.
पाकिस्तानी संघाने जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर एकूण ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामुळे स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळाडूंचे एकूण २५ फोटो लावण्यात आले होते. या भिंतीला ‘वैभवाची भिंत’ म्हणून ओळखले जाते. पण आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनने सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयावरून असे दिसून येते की आता क्रिकेटमध्येही भारत आणि पाकिस्तानमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून भारतात अधूनमधून दहशतवादी हल्ले करण्यात येतात. याआधी २०१९ मध्ये पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे आता पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटोही काढून टाकण्यात आले आहेत.
हेही वाचा : अभिषेक शर्मा – दिग्वेष राठी मैदानात भिडले! खेळाडूंमध्ये बाचाबाची, सोशल मीडियावर Video Viral
एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, भारत-पाकिस्तान यांच्यात वाढत्या तणावानंतर, बीसीसीआयने आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी पुढे ढकलले होते. त्यानंतर १७ मे पासून लीग पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता. पण लीग एका आठवड्यासाठी पुढे ढकलल्यानंतर आता अंतिम सामना हा ३ जून रोजी खेळवण्यात येणार येहे.