Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 PSL-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके! PSL-11 मधून अफगाण खेळाडूंनी घेतली माघार; नेमकं कारण काय? 

पाकिस्तानला झटक्यांवर झटके बसत आहेत. आता संघाला आणखी एक झटका बसला आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या 11 व्या आवृत्तीपूर्वी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात अनेक अफगाण क्रिकेटपटूंनी माघार घेतली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 12, 2026 | 05:36 PM
PSL-11: Pakistan suffers setbacks! Afghan players withdraw from PSL-11; What is the real reason?

PSL-11: Pakistan suffers setbacks! Afghan players withdraw from PSL-11; What is the real reason?

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan Super League-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके बसत असल्याचे वारंवारं दिसून येत आहे. आता अशातच पाकिस्तान सुपर लीगच्या 11 व्या आवृत्तीपूर्वी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात अनेक अफगाण क्रिकेटपटूंनी माघार घेतली आहे. पीएसएल मध्ये अशा प्रकारची औपचारिक लिलाव प्रक्रिया पहिल्यांदाच आयोजित केली गेली होती. सुरुवातीला असे वृत्त समोर आले होते की मुजीब उर रहमान, सेद्दिकुल्लाह अटल, मोहम्मद नबी, वकार सलामखेल आणि फजल हक फारुकी यांच्यासह अनेक प्रमुख अफगाण खेळाडूंकडून लाहोरमध्ये लिलावासाठी नोंदणी करण्यात आली होती.

हेही वाचा : SL vs OMA : 6,6,6,6,6… दासुन शनाकाने फलंदाजीने केला कहर, तुफानी अर्धशतक झळकावून रचला इतिहास

तथापि, पेशावर झल्मीने थेट अफगाण विकेटकीपर-फलंदाज रहमानउल्लाह गुरबाजला करारबद्ध करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले.  या निर्णयावर देखील टीका झाली, ज्यामुळे गुरबाजने पीएसएलमधून माघार घेतली. त्यानंतर लवकरच, इतर अफगाण खेळाडूंनी देखील आता लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली आहे.

पीएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय म्हणाले?

पीएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नसीर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, काही अफगाण खेळाडूंचा लिलाव यादीत समावेश करण्यात आला होता, परंतु कोणत्याही फ्रँचायझीकडून त्याची निवड करण्यात आली नाही. ते म्हणाले, “लिलावात काही अफगाण खेळाडू होते, परंतु कोणत्याही संघाने त्यांना खरेदी केले नाही.” तथापि, त्यांनी हे देखील मान्य केले की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अलिकडच्या ताणलेल्या संबंधांचा संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.

हेही वाचा : NEP vs ITA, T20 World Cup 2026 : नेपाळने इटलीसमोर टेकले गुडघे! पौडेल आर्मी 123 धावांवर गारद

नसीर यांच्या मते, गुरबाजच्या समावेशानंतर झालेल्या टीकेचा वातावरणावर खूप परिणाम झाला. त्यांनी असे देखील सांगितले की टीका टाळण्यासाठी गुरबाजने माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि इतर खेळाडूंकडून देखील त्याचेच अनुकरण करण्यात आले.

नेमकं प्रकरण काय?

एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की, गेल्या वर्षी दहशतवादविरोधी कारवायांच्या नावाखाली पाकिस्तानी सैन्याकडून अफगाणिस्तानच्या काही भागात हवाई हल्ले करण्यात आले होते. यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि राजकीय संबंधांमध्ये तणावात वाढ झाली होती. त्यावेळी अनेक अफगाणिस्तानी खेळाडूंनी देखील सोशल मीडियावर पाकिस्तान सरकारवर टीका केली होती. आता पीएसएल ११ च्या लिलावात अफगाणिस्तानी खेळाडूंनी घेतलेल्या माघारीवरुन पुन्हा एकदा क्रिकेट आणि राजकारणातील परस्परसंवाद अधोरेखित झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Psl 11 big blow to pakistan afghan players withdraw from psl 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket
  • Pakistan Super League
  • PCB

संबंधित बातम्या

IND vs PAK सामन्यावर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया! उपाध्यक्ष Rajiv Shukla यांनी स्पष्टच सांगितलं…
1

IND vs PAK सामन्यावर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया! उपाध्यक्ष Rajiv Shukla यांनी स्पष्टच सांगितलं…

T20 World Cup 2026 : PCB सह BCB ने तर आता लाजच सोडली! ICC समोर नको त्या अटींचा घातला रतीब; हायब्रिड मॉडेलवर केले भाष्य…
2

T20 World Cup 2026 : PCB सह BCB ने तर आता लाजच सोडली! ICC समोर नको त्या अटींचा घातला रतीब; हायब्रिड मॉडेलवर केले भाष्य…

IND VS PAK :  “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया
3

IND VS PAK :  “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया

IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्यावर बाॅयकाॅट करण्याच्या निर्णयावर पाकिस्तान यू-टर्न घेणार, पीसीबी करणार सरकारशी चर्चा
4

IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्यावर बाॅयकाॅट करण्याच्या निर्णयावर पाकिस्तान यू-टर्न घेणार, पीसीबी करणार सरकारशी चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.