IND vs AUS (Photo Credit- X)
IND vs AUS 2nd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यातील दुसरा वनडे सामना अॅडेलमध्ये खेळवला जात आहे. भारतासाठी हा सामना ‘कोर या मरो’ सारखा असणार आहे, कारण भारताला पहिल्या वनडे सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. अश्यातच भारताने आजचा सामना नावावर केला नाही तर मालिकाहा गमवावी लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी अमंत्रित केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियामसमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तर रोहित-अय्यरने अर्धशतक झळकावले आहे.
Innings Break! A 118-run partnership between Rohit Sharma and Shreyas Iyer propels #TeamIndia to a total of 264/9. Scorecard – https://t.co/q4oFmXx6kr #TeamIndia #AUSvIND #2ndODI pic.twitter.com/o5dN2FGhtA — BCCI (@BCCI) October 23, 2025
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली, त्यांनी फक्त १७ धावांत दोन फलंदाज गमावले. कर्णधार शुभमन गिल ९ आणि विराट कोहली ० धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला आणि संघाचा स्कोअर १३५ पर्यंत नेला.
प्रथम फलंदाजी करताना, टीम इंडियाने निर्धारित ५० षटकांत नऊ गडी गमावून २६४ धावा केल्या. भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक ७३ धावा केल्या. या शानदार खेळीदरम्यान रोहित शर्माने ९७ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकार ठोकले. श्रेयस अय्यरने रोहित शर्मासह ६१ धावा केल्या.
दुसरीकडे, झेवियर बार्टलेटने ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झंपाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. अॅडम झंपासह, झेवियर बार्टलेटनेही तीन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत २६५ धावा करायच्या आहेत. टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.